बॉलिवूडमधील हॉट कपलपैकी एक जोडी म्हणजे अभिनेता शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत. 2015 साली या दोघांनी लग्नगाठ बांधली असून त्यांना दोन मुलंदेखील आहेत. सोशल मीडियावर सक्रीय असणारी ही जोडी अनेक वेळा इन्स्टा, फेसबुक यांच्या माध्यमातून आपल्या फॅमिलीचे किंवा मुलांचे फोटो शेअर करताना दिसतात.

विशेष म्हणजे शाहिदपेक्षा मीरा सोशल मीडियावर जास्त सक्रीय आहे. मीरा कलाविश्वामध्ये सक्रीय नसली तरी ती काही जाहिरातींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. त्यामुळे शाहिदप्रमाणेच मीरा कलाविश्वात पदार्पण करणार का? असे प्रश्न अनेक वेळा तिला आणि शाहिदला विचारण्यात येतात. मात्र यावेळी शाहिदने मीराच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी एक वक्तव्य केले. ज्यामुळे अनेकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले आहे.
एका मुलाखतीमध्ये शाहिदला मीराच्या बॉलिवूड करिअरविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावर उत्तर देताना ‘हा सर्वस्वी मीराचा निर्णय असेल’, असे शाहिदने सांगितले. ‘कलाविश्वामध्ये पदार्पण करायचे की नाही हा सर्वस्वी मीराचा निर्णय आहे. आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्हाला पहिली मुलगी झाली आणि त्यानंतर दोन वर्षांनी मुलगा. त्यामुळे आता अन्य कोणत्या कामांसाठी मीराला वेळ देता येणे तसे कठीणचं आहे’, असे शाहिदने सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शाहिदचा कबीर सिंग हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली असून त्यानंतर शाहिदने त्याच्या मानधनातही वाढ केली आहे.