sports

गजा मारणेला अटक करणार्‍या सपोनि अमोल माने व सहकार्‍यांचा ना. देसाईंनी केला गौरव


‘कमी मनुष्यबळ असतानाही मेढा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी गजा मारणे याला अटक केली याबद्दल शासनाकडून योग्य सन्मान व्हावा यासाठी पाठ पुरावा करणार आहे,’ असे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले.

सातारा : ‘कमी मनुष्यबळ असतानाही मेढा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी गजा मारणे याला अटक केली याबद्दल शासनाकडून योग्य सन्मान व्हावा यासाठी पाठ पुरावा करणार आहे,’ असे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले.

गजा मारणेप्रकरणी कारवाईत समावेश असलेल्या मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने, पोलीस हवालदार जितेंद्र कांबळे, इम्रान मेटकरी व अमोल पवार यांचा सत्कार गृह राज्यमंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

या सत्काराप्रसंगी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.

गजा मारणे याच्या शोधात पोलीस होते. कमी मनुष्यबळ असतानाही मेढा पोलीस ठाण्याने त्याला अटक केली. त्यांचे कौतुक करून शासनाकडून योग्य तो सन्मान व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही देसाई यांनी सत्काराप्रसंगी सांगितले.

यावेळी पोलीस हवालदार मोना निकम यांनी नऊवारी साडी घालून हिरकणी कडा सर केल्याबद्दल गृह राज्यमंत्री ना. देसाई यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.