गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले : भाटमरळी ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांचा सत्कार
‘सातारा तालुक्यातील भाटमरळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी महिलांना गावचा कारभार करण्याची संधी दिली आहे. सातही जागांवर महिला बिनविरोध झाल्या असून, महिलाराज असलेल्या या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा कायापालट होईल. गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू,’ असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
सातारा : ‘सातारा तालुक्यातील भाटमरळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी महिलांना गावचा कारभार करण्याची संधी दिली आहे. सातही जागांवर महिला बिनविरोध झाल्या असून, महिलाराज असलेल्या या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा कायापालट होईल. गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू,’ असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विचारांची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या भाटमरळी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. ग्रामस्थांनी सातही जागांवर महिलांना संधी देऊन गावाचा कारभार त्यांच्या हाती दिला आणि एक आदर्श निर्माण केला.
सरपंचपदी निर्मला माणिक चव्हाण तर उपसरपंचपदी मोनाली भीमराव जाधव यांची निवड झाली.
नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्य मीना देशमुख, गौरी क्षीरसागर, सुश्मिता अडागळे, रिनल जाधव, नीलम जाधव यांचा आ. शिवेंद्रसिंहराजे आणि वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘गावचा कारभार महिलांच्या हाती देऊन भाटमरळीच्या ग्रामस्थांनी एक आदर्श निर्माण केला आहे. या संधीचा फायदा घेऊन सर्वांनी गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत आणि ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ करावा. गावाच्या विकासासाठी आपण वाट्टेल ते सहकार्य करू,’ असा शब्द त्यांनी यावेळी दिला.


