By वडूज प्रतिनिधी I आकाश यादव Mon 19th Oct 2020 03:22 pm
तत्कालीन खटाव तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांची सांगली अप्पर तहसीलदार म्हणून बदली झाल्यानंतर खटाव तहसीलदार म्हणून किरण जमदाडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात अली होती. मात्र तत्कालीन तहसीलदार डॉ अर्चना पाटील या सांगलीला हजर होऊन ही खटावला तहसीलदार हजर झाले न्हवते. किरण जमदाडे यांच्याकडे सोलापूर जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षाचे प्रमुख, संजय गांधी योजना, बार्शी तहसीलदार पदाचा पदभार होता. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणाहून कार्यमुक्त केले नव्हते. श्री जमदाडे यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी असून त्यांनी त्या ठिकाणी कौतुकास्पद काम केले आहे. अनेक विभागाचे पदभार त्यांनी सोयीस्कर रित्या पार पाडले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरामध्ये अडकलेल्या अनेक जणांचे प्राण त्यांनी वाचवले आहेत. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून तसेच जिल्हाधिकारी सोलापूर यांनीही कौतुकाची थाप टाकली होती. उद्या दि २० रोजी तहसीलदार किरण जमदाडे हे खटाव तालुक्याचा पदभार स्वीकारणार आहेत.