sports

जिल्ह्यात 337 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 नागरिकांचा मृत्यू


जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 337 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 11 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सातारा : जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 337 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 11 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
यामध्ये वाई तालुक्यातील पिराचीवाडी 1, मालखेड 5, उडतारे 1, देगाव 1,  वहागाव 1, गंगापुरी 1, सोनगिरीवाडी 1, सिद्धनाथवाडी 2, पोलीस स्टेशन 1, वाई 1, गणपतीआळी 2, पळशी यशवंत आळी 2, शेलारवाडी 1, धर्मापुरी 1, किकली 1, बावधन 5, गरवारे वॉल 2, भुईंज 1, वळसे 1. कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक 1, बनवडी 3, कराड 17, ओंड 6, महीगाव 5, येळगाव 1, सह्याद्री हॉस्पिटल 1, वहागाव 1, उंडाळे 4, उंब्रज 1, कालवडे 1, शनिवार पेठ 4, बेलवडे 1, हजारमाची 5, गोवारे 1, सैदापूर 1, बुधवार पेठ 1, चेचेगाव 1, मलकापूर 11, केवळ 1, कार्वेनाका 1, आगाशिवनगर 6, रेठरे बुद्रुक 1, खडेपूर 1, काले 1, शुक्रवार पेठ 1, सोमवार पेठ 1, अटके 1, कोयना वसाहत 1, ताकवे 1, कोर्टी 1, गोळेश्‍वर 2, रविवार पेठ 2, हिंनगोळे 1, मंगळवार पेठ 3, शरद क्लिनिक 3, कापील 1,  जारवे 1, कोल्हापूर नाका 1,  धोंडेवाडी 1, सावडे 1, रुक्मिणीनगर 1, सरताळे 1, कार्वे 1.
सातारा तालुक्यातील सदरबझार 5, प्रतिभा हॉस्पिटल 1, करंजे 5, अंबेदरे 2, सातारा 14, सिटी पोलीस लाईन 2, शनिवार पेठ 8, सासपडे 1, विकासनगर 1, सोमवार पेठ 2, केसकर पेठ 1, कोंडवे 2, गोवे 1, वडूथ 1, मोळाचा ओढा 2, गोडोली 3, पळशी 1, देवी चौक 1, सासपडे 4, शाहूनगर 3, अतीत 1, रांगोळी कॉलनी 1, मिस्तेवाडी 1, निगडी 4, दिव्यनगरी 1,  कापेर्डे 1, बारावकरनगर संभाजीनगर 10, रविवार पेठ 1, लिंब 1, निगडी 1. 
फलटण तालुक्यातील खोळकी 1, आदर्की बु. 1,  साखरवाडी 3, तरडफ 1, हत्तीखाना 1, मंगळवार पेठ 1, फलटण 2, खटकेवस्ती 5, तामखाडा 5, मुंजवडी 4, मिर्ढे 3, गोखळी 1, कसबा पेठ 1, नाईकबोमवाडी 1, डी.एड चौक 1,  विडणी 1, शुक्रवार पेठ 1,  बुधवार पेठ 1. महाबळेश्‍वर तालुक्यातील मोहल्ला स्कूल 1, तळदेव 1, नगरपालिका 13, बेल एअर पाचगणी 1, शिवाजीनगर पाचगणी 1. कोरेगाव तालुक्यातील कोलवडी 1,  सोळशी 1, पिंपोडे बुद्रुक 1, कोरेगाव 6, चिमणगाव 1.
खंडाळा तालुक्यातील लोणंद 4, खेड 1, नायगाव 1,  शिर्के कॉलनी शिरवळ 1, फुलमळा शिरवळ 4, आरदगाव 1,  गावडेवाडी 1, मोरवे 1, सह्याद्रीनगर शिरवळ 1, बाधे 2, शिरवळ 1.  पाटण तालुक्यातील मल्हारपेठ 1, सावंतवाडी 1, ढेबेवाडी 1, विहे 1, मारुल हवेली 1. माण तालुक्यातील म्हसवड 11, खटाव तालुक्यातील मायणी 5, डिस्कळ 1, कलेढोण 1, विटणे 1, बनपुरी 1, नांदोशी 1,  तडवळे 1, जावली तालुक्यातील कुसुंबी 1, बामणोली 1,  महिगाव 7, खरशी 1. इतर 4.
बाहेरील जिल्ह्यातील 1, इस्लामपूर (जि. सांगली) 1, वाळवा 1, सांगली 1. 

अकरा बाधितांचा मृत्यू
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे अतीत, ता. सातारा येथील 94 वर्षीय पुरुष, राजुरी, ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष, भुईंज, ता. वाई येथील 65 वर्षीय महिला, विडणी, ता. फलटण येथील 52 वर्षीय महिला, धामणी, ता. पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, तसेच वाई तालुक्यातील खासगी हॉस्पिटल येथे मोरजीवाडा चिखली, ता. वाई येथील 55 वर्षीय महिला, पाटण येथील 86 वर्षीय पुरुष, शिंदूरजणे, ता. वाई येथील 75 वर्षीय महिला, कराड खासगी हॉस्पिटमध्ये शनिवार पेठ कराड येथील 77 वर्षीय पुरुष, मारुल हवेली, ता. पाटण येथील 76 वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये वळसे, ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष असे एकूण 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.