maharashtra

मौजे वडले येथे गण हातोडा दे असे म्हणत दुधेबावी येथील एकाने चाकूने मारून जखमी केल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


A case has been registered in the rural police station in the case of a man from Dudhebavi stabbing and injuring a person in Mauje Wadle by saying 'Gan Hatoda De'.
मौजे वडले येथे गण हातोडा दे असे म्हणत दुधेबावी येथील एकाने चाकूने मारून जखमी केल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे वडले तालुका फलटण गावचे हद्दीत दिंनाक २१ रोजी फिर्यादी कार्तिक बाबू चव्हाण (वय 23, चिखली जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक) हा डीजेलचे टँकर मधून डिझेल डंपर मध्ये भरत असताना तिथे रणजीत उर्फ बाबू सोनुलकर (पूर्ण नाव माहित नाही राहणार दुधेबावी तालुका फलटण) हा फिर्यादी चव्हाण याच्या जवळ आला हो म्हणाला की मला तुझ्याकडे असणारा गण हातोडा दे असे म्हणल्यावर फिर्यादी याने त्याला माझ्याकडे घन नाही गण हातोडा जेसीबी मशीन मध्ये आहे असे म्हटल्यावर रणजीत उर्फ बाबू सोनुलकर याने पॅन्टचे खिशातून चाकू काढून फिर्यादीच्या पाठीत मानेला उजव्या बाजूला व उजवी दंडावर चाकूने मारून जखमी केले व पळून गेला अशी फिर्याद कार्तिक बाबू चव्हाण याने ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार खाडे करत आहेत.