फलटण : ऐतिहासिक प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रा फलटणसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत “प्रभू श्रीरामचंद्र की जय,प्रभू श्रीरामचंद्र की जय..” च्या नामघोषात परंपरागत पध्दतीने मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली.
मौजे वडले येथे गण हातोडा दे असे म्हणत दुधेबावी येथील एकाने चाकूने मारून जखमी केल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण प्रतिनिधी:- शहर आणि परिसरात घराघरांमध्ये शिवजयंती उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात पारंपरिक वाद्यात आणि भव्यदिव्य देखाव्यासहित मिरवणुका काढून साजरी करण्यात आली.
मुंजवडी (ता. फलटण) येथील पवारवस्तीत घराशेजारील महिलेशी अनैतिक संबधाच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत एका महिलेचा खून झाला.
खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी विकासकामांचा धडाका लावल्याने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे.
संपूर्ण राज्यभरात बिफ हब म्हणून ओळखल्या जाणार्या फलटण तालुक्यामध्ये गेल्या अनेक दशकांपासून राजरोसपणे गोवंशाची कत्तल केली जात होती. महानुभाव पंथाची काशी समजल्या जाणार्या फलटणला याच बिफ माफियांनी आता जेरीस आणले आहे.
सर्वसामान्यांचा विचार न करता प्रत्येक ठिकाणी आपल्याच घरातील लोकांनाच पद, उमेदवारी देऊन तालुक्यावर हुकूमशाही लादली जात असल्याचा टोला माढा लोकसभा खासदार रणजितदादा नाईक-निंबाळकर यांनी मिस्टर रामराजे यांना लगावला.
शेतकऱ्यांचा जळलेला ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी वेळ लागत होता. ही बाब संबंधित अधिकाऱ्यांनी माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सांगितली. त्यामुळे लगेचच ऊर्जा विभागाकडून एकाच दिवसात 58 ट्रान्सफॉर्मर फलटण मध्ये दाखल झाले असून अधिकारी व शेतकऱ्यांनी खासदार रंजितसिंहाच्या कामाचे कौतुक केले.
एकंदरीतच मिस्टर रामराजेंसारखा गद्दार आणि लाचार पंटर फलटण तालुक्याला मिळाला होता, अशी घणाघाती टीका खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मिस्टर रामराजेंवर नाव न घेता केली आहे.
माढा मतदारसंघात ज्यांच्या कार्यकाळात झाली नाहीत ती कामे थोड्या अवधीतच पूर्णत्वास गेल्याने मिस्टर रामराजेंच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच ते काहीही वक्तव्ये करीत असल्याचे सांगत खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातारा येथे मिस्टर रामराजेंची उरली सुरलीही काढली.
फलटण येथील जुगार अड्ड्यावर छापा मारत पोलिसांनी सात जणांवर गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्याकडून एकूण 3 लाख 18 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या बजेटच्या पुरवणी मागणीमध्ये फलटण-बारामती जे रेल्वे कामासाठी 100 कोटी व फलटण पंढरपूर साठी २० कोटी तरतूद बजेटमध्ये करावी, अशी मागणी केली. त्याची दखल घेऊन वित्त मंत्री निर्मला सीताराम यांनी बजेटमध्ये 120 कोटी रुपयांची तरतूद केली.
नीरा-देवघर प्रकल्पाला निधी मंजूर केल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा नागरी सत्कार शनिवार, दि.४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता गजानन चौक, फलटण येथे आयोजित केला असल्याची माहिती जयकुमार शिंदे, बजरंग गावडे, अमोल सस्ते, अशोकराव जाधव यांनी दिली आहे.
केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या माध्यमातून फलटण शहर, तालुका व माढा लोकसभा मतदार संघातील विकास कामे व रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. त्याबद्दल फलटण येथे शुक्रवार दि. २७ जानेवारी रोजी त्यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी दिली.
फलटण तालुक्यातील गिरवी मधील स्वराज बंगल्याच्या खोल्यांची कुलपे तोडून पाच जणांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात बाललैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षा भोगत असणाऱ्या फलटण, ता. फलटण येथील कुरेशी नगर मधील आझम कासम शेख, वय ५४ याचा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला.
आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गासोबतच फलटण शहरामधून जो पालखी मार्ग मार्गस्थ होत आहे, तो मार्ग सुद्धा व्यवस्थित करून त्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली होती.
फलटण, ता. फलटण येथील मंगळवार पेठेतून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ४ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. यामध्ये रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.
फलटण शहरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे 55 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
फलटण, ता. फलटण येथे रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवल्याने विक्रेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नगरपालिका व अतिक्रमण हटाव विभागाच्या विरोधात आंदोलन केली. यावेळी छोट्या व्यापाऱ्यांच्या नुकसानाला जबाबदार कोण, असा खडा सवाल त्यांनी केला.
फलटण बसस्थानकात अज्ञात चोरट्याने एका महिलेचे एक लाख 68 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
माण-खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल येथे उपचार सुरु आहे. गोरे यांच्यासह 4 जण त्या गाडीतून प्रवास करत होते.
फलटण शहरात घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
फलटण लगत मौजे जाधववाडी येथील ओढ्यावर लहान पुल व पोहोच रस्ता बांधकाम करण्यात येणार असल्याने, दि. 24 डिसेंबर 2022 ते 24 एप्रिल 2023 पर्यंत चार महिने या रस्त्यावरील पुलावरुन वाहतुक बंद करण्यात येणार आहे.
पंढरपूर महामार्गावरील फलटण तालुक्यातील विडणी गावाच्या हद्दीत अब्दागिरेवाडी येथे डांबरी रस्ता सोडून सुमारे चाळीस फूट आतमध्ये असलेल्या घरामध्ये भरधाव वेगाने येणारा ट्रॅक्टर शेतकऱ्याच्या घरामध्ये घुसला असल्याची घटना नुकतीच घडली आहे.
फलटणमध्ये नवजात स्त्री जातीचे अर्भक सापडले असून हे अर्भक बाल शिशुगृहात पुढील संगोपनासाठी दाखल केले आहे.
गॅस एजन्सीच्या आमिषाने फलटणमधील डॉक्टरची सुमारे अकरा लाखांची फसवणूक झाल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
मौजे सासकल येथे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित फलटण एज्युकेशन सोसायटी चे फलटण कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीचे शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल येथे 'राष्ट्रीय शिक्षण दिन' साजरा करण्यात आला.
निंभोरे तालुका फलटण गावच्या हद्दीत एका दाम्पत्याच्या जवळ असलेली पर्स व त्यातील सुमारे ७४५०० रुपयांचा मुद्देमाल तीन अनोळखी व्यक्तींनी जबरी चोरी करून लुटून नेला आहे.
फलटण, ता. फलटण येथून अज्ञात चोरट्याने चारचाकी कारची पाठीमागील काच तोडून १२ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या वाढदिवसादिवशीच राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्टच असून या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.
फलटण तालुक्यातील एका गावात वास्तव्य करणाऱ्या एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी मिरगाव, ता. फलटण येथील एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारमुळे देशात आमूलाग्र बदल होवून अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. सर्वच पातळ्यांवर देशाची प्रगती होत आहे. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही. मात्र कॉंग्रेससह राज्यातील राष्ट्रवादीच्या बारामती आणि फलटणकरांची घराणेशाही मात्र एकदम ओक्केच असल्याचा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी लगावला.
बनावट प्लायवूड विक्री केल्याप्रकरणी चौधरवाडी, ता. फलटण येथील अमोल विलास चौधरी (वय 34) या व्यापार्याविरोधात कॉपीराईट अधिनियमानुसार फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जोशी हॉस्पिटल प्रा, लि. आणि ट्रामा सेंटर, फलटणच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त मॅरेथॉन चे आयोजन बुधवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वा. सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथे करण्यात येत असल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
बारामती शहरातील श्रीरामनगर भागात जुन्या वादाच्या कारणातून अल्पवयीन मुलांनी फलटण तालुक्यातील एकाचा खून केला. शशिकांत बाबासो कारंडे (वय ४७, मूळ रा. मठाचीवाडी, ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा. एचडीएफसी बॅंकेमागे, भिगवण रोड बारामती) असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.
जुन्या वादातून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना फलटण, ता. फलटण येथे घडली आहे.
फलटणमध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करत सुमारे 49 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
ब्रिटिशकालीन फलटण- पंढरपूर लोहमार्गासाठी लवकरच निधीची तरतूद करू, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण ग्रामीण पोलीसानी साखरवाडी येथे छापा टाकून अवैध गांजा विक्री करणाऱ्या चंदाबाई बाळू जाधव या संशयित महिलेस 61 हजार 500 रुपये किमतीच्या गांजासह अटक केली आहे.
नॉर्थरडॅम येथे खुल्या गटात पार पडलेल्या लॉन टेनिस स्पर्धेत भारताच्या विश्वजीत सांगळे याने विजेतेपद पटकावले आहे. बेनॉइट एच या फ्रान्सच्या खेळाडूचा 6-2,7-5 अशा सरळसेटमध्ये पराभव करून विश्वजीतने विजेतेपद खेचून आणले.
जरा आजूबाजूच्या फलटण, दौंड, इंदापूर तालुक्यात जाऊन बघा, तिथल्या आणि इथल्या परिस्थितीत किती फरक आहे? गेली दोन दशके फलटणची जनता राष्ट्रवादीला कौल देत आहे, पण चार वेळा सत्तेत असून ही राष्ट्रवादीला फलटण तालुक्याचा विकास करता आला नाही, अशी स्पष्ट कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.
एमएसईबी पतसंस्था, फलटण शाखेत 27 हजार 800 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन वरीष्ठ लिपीकावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण तालुक्यातील सुरवडी येथील फलटण- लोणंद मार्गावर जगतापवस्ती नजीक झालेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले आहेत, तर १0 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.
फलटण नगर परिषद परिसरातील मेटकरीगल्ली भागातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त महिलांनी ऐन सणासुदीतच नगरपालिकेसमोरच मोकळे हंडे घेऊन धरणे आंदोलन धरले. ऐन सणासुदीत पाण्यासाठी आंदोलन करावे लागल्याने महिलांनी यावेळी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू व्हावे यासाठी वेळोवेळी मागणी केलेली आहे. त्यांच्या मागणीची दखल घेत आगामी काळामध्ये फलटणच्या पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करणार असल्याची ग्वाही केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनी दिली.
सातारा येथील युवतीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या फलटण, ता. फलटण येथील युनूस बालेखान पठाण आणि त्याचा सहकारी नौशाद पठाण यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. तळागळातील शास्त्रज्ञ अशी डॉ. राजवंशी यांची ओळख आहे. निंबकर कृषि संशोधन संस्था (नारी) चे ते संचालक आहेत. डॉ. राजवंशी यांनी अक्षय ऊर्जा संशोधन, ग्रामीण आणि सतत विकास याविषयांवर त्यांचा तीस वर्षापेक्षा अधिक अभ्यास आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.
फलटण येथून दोन पिस्तुल व एका काडतुसांसह दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे ३ पिस्तूल, १ जिवंत काडतुस, ७ मोबाइल, ११ बॅटऱ्या, एक स्विफ्ट कार, शस्त्र व रोख रक्कम असा एकूण ७ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. किरण बबन साळुंखे, वय ३८, सध्या रा. लेक पॅलेस अपार्टमेंट, शिरवळ, ता. खंडाळा आणि तरबेज मेहबूब सुतार, वय ३८, रा. ओमसाई अपार्टमेंट, वरखडे नगर, कात्रज, पुणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फलटण तालुक्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणाऱ्या दारू अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ६ हजार ४२० रुपये किमतीच्या हातभट्टी व देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
फलटण पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी धन्यकुमार गोडसे, चार पोलीस अधिकारी आणि 20 पोलीस अंमलदार यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशंसापत्र देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी गौरविले आहे.
माण आणि खटाव या दोन दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचा समावेश प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत करुन योजनेच्या उर्वरित कामासाठी ६९७ कोटींचा निधी मिळण्यासाठी तसेच फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम त्वरित सुरु करावे, या मागणीसाठी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. जयकुमार गोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली.
फलटण तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांवर मोठी कारवाई करत सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्याकडून १० लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी प्रशांत सतीश भिसे वय १९, महेश उर्फ अक्षय विकास गायकवाड वय २६, आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेची नवीन वर्षातील ही पहिलीच मोठी कारवाई समजली जाते.
उसाचा रस आणि बोयोसिरपवर आधारित आशियातील सर्वांत मोठा इथेनॉल प्रकल्प फलटणमध्ये उभारत असल्याची घोषणा स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेडने केली आहे. प्रकल्पाची क्षमता पहिल्या टप्प्यात प्रति दिन 500 व दुसर्या टप्प्यात 1100 किलो लिटरपर्यंत वाढवली जाणार असून, यासाठी आवश्यक मान्यता मिळाली असल्याचेही सांगण्यात आले आहे. हे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांचे यश मानण्यात येत आहे.
फलटण येथे क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन 4 ते 6 वर्षांच्या लहान मुलांसह त्यांच्या आईलाही काठीने मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. या छोट्या बालकांसह त्यांच्या आर्इला मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी आगम यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना निलंबित करण्याची मागणी मारहाण झालेल्या पिडीत महिलेसह फलटण दत्तनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पासपोर्ट काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याला हेलपाटे मारण्याची सुरु असलेली पध्दत साताऱ्यातील मुख्य पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरु झाल्याने बंद झाली. सातारा जिल्ह्यातील सर्वांना साताऱ्यात पासपोर्ट उपलब्ध होवू लागले. मात्र, इतर तालुक्यातून सातारला येणे देखील अनेकवेळा गैरसोयीचे ठरत असते.
तालुक्यातील खटकेवस्ती गावच्या हद्दीत वड्याचा माळ या शिवारात ऊसाच्या शेताजवळ आंब्याच्या झाडाखाली चालणार्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी पोलिसांनी छापा मारला. यावेळी पोलिसांनी मोबाईल व जुगाराचे साहित्य असा 77 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 12 जुगार्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नुकतीच साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सुरवात झाली आहे. यामुळे शहरातील ऊस वाहतूक वाढल्यामुळे रस्त्यावरील धोका वाढला आहे. याचा प्रत्यय फलटणकरांना दि. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आला. फलटण शहरातील रिंग रोड वरून जाताना, डीएड कॉलेज चौक येथे उसाने भरलेल्या ट्रॉलीचे लॉक तुटल्याने ट्रॅक्टर पासून ट्रॉली वेगळी झाली.
राज्यसभेचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले कधी काय करतील, याचा नेम नसतो. त्याचाच प्रत्यय आज फलटणकरांना आला. सातारच्या राजकारणात एकमेकांचे जानी दुश्मन म्हणून ओळखले जाणारे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी जात खा. उदयनराजेंनी जिल्हावासीयांना पुन्हा एकदा जोर का झटका धीरे से दिया.
फलटण तालुक्यातील न्यू फलटण शुगर वर्क्स या कारखान्याने 2017-18 च्या हंगामातील बिल ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिल दिले नाही. उलट न्यायालयाकडून शेतकऱ्यांनाच नोटीसा बजावल्या आहेत. चार दिवसात कारखान्याची मुजोरी थांबली नाही तर बच्चूभाऊंच्या नेतृत्वाखाली मस्तवाल कारखानदारास प्रहार जनशक्ती पक्षाकडून धडा शिकवला जाईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा, सोलापूर संपर्क प्रमुख शंभूराज खलाटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
शहरातील शिवाजी नगर, येथे एका छोट्या खड्ड्यात नवजात स्त्री जातीचे अर्भक सापडले आहे. त्याच्यावर सातारा सिव्हिल येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती उत्तम आहे. याबाबत अज्ञात इसमावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीसांनी बेकायदेशीर अंमली पदार्थ गांजावर धडक कारवाई केली आहे. यामध्ये सुमारे 2 किलो 592 ग्रॅम वजनाचा 20 हजार 800 रुपयांचा माल जप्त केला आहे.
तमाम ओबीसी समाजाच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांबाबत आज ओबीसी जनमोर्चाच्या वतीने फलटण तहसीलदार यांना शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यात आले.
फलटण : एका भेंडी विक्रेत्याला मोठा व्यापारी आला आहे त्याला तुमच्याकडून भेंडी घ्यायचे आहे असे फसवून त्यास मारहाण करून त्याचे कपडे कडून महिले बरोबर अश्लीलफोटो काढून ब्लॅकमेल करत 15 लाख 50 हजाराची खंडणी वसुली करणाऱ्या पाच जनाविरोधात फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे या आरोपींनी अनेकांना ब्लॅकमेल केले असल्याच्या शक्यतेने पोलिसांनी तक्रारदारांना तक्रारी देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे
फलटण प्रतिनिधी - येथील नगर पालिकेने उभारलेल्या राजधानी टॉवर्स मधील गाळ्यामध्ये एका व्यवसायिकाने खिडकीच्या जागी शटर बसवून बदल करीत दुकानाचा पायऱ्या काढीत अतिक्रमण केल्याची तक्रार पालिकेचे गटनेते अशोकराव जाधव यांनी केली असुन या बाबतीत माहिती घेऊन पुढील कारवाईचे आश्वासन नूतन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिले आहे दरम्यान नूतन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी आज फलटण पा...
‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी संपूर्ण फलटण शहरासह तालुक्यातील 8 गावांत दि. 2 ते 8 मे दरम्यान प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) घोषित करून दवाखाने व औषध दुकाने वगळता दूध, भाजीपाला, किराणा या अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यापार/व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
फलटण शहरासह तालुक्यात सोमवारी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. अनेक भागात जोरदार गारपीट झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. गारांच्या पावसाचा आनंद अनेकांनी मनमुरादपणे आनंद लुटला तर फलटण शहरात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते तसेच रस्ते जलमय झाले होत.े
‘सध्या फलटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. फलटण तालुक्यातील नागरिकांना सध्या फलटणमध्ये कोरोना उपचारासाठी बेड्स मिळत नाहीत. अशी सर्व परिस्थिती असताना माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे स्वखर्चाने फलटण शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच रविवार पेठेमधील उत्कर्ष लॉज येथे 75 बेड्सचे कोरोना केअर सेंटर सुरू करणार आहेत,’ अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, फलटण येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास 43 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कर्तव्य केले आहे.
ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून एका जेष्ठ कोरोना बाधित रुग्णाने पलायन केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दोनच दिवसापुर्वी आमदार दीपक चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयाने कारभार सुधारावा असे फटकारले असतानाच हा गंभीर प्रकार घडल्याने येथील गचाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या निमित्ताने इन्सिडंट कमांडर तथा प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप दोषींवर कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
संपूर्ण फलटण शहरासह रिंग रोडवरील अनेक अतिक्रमणे हटवून फलटण नगरपरिषदेने बराचसा श्वास मोकळा केला आहे. मात्र याचवेळी ज्वेलरीचे भलेमोठे शोरूमचे अतिक्रमण रिंगरोड वरील रस्त्यावर आल्याचे दिसत असून, याकडे नगरपरिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा फलटणकर नागरिकांमधून होत आहे. या अतिक्रमणाला राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.
फलटण शहर आणि तालुक्यात संचारबंदीच्या पहिल्या दिवशी कुठं शुकशुकाट तर कुठं वर्दळ असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे संचारबंदी आदेशाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन, महसूल व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण शहरात संचलन करून नागरिकांना संचारबंदी आदेशाच्या नियमांची अंमलबजावणी बाबत आवाहन करण्यात आले.
बदामी रंगाच्या आयशर प्रो कंपनीचा चार चाकी टेम्पो क्र. (एमएच 50/8333) या गाडीत गोवंशीय जातीची अंदाजे एक ते दोन महिने वयाची बारा जर्सी गायची वासरे कत्तल करण्यासाठी दाटीवाटीने डांबून ठेवलेली मिळून आली असून, तौफिक इम्तियाज कुरेशी (रा. कुरेशीनगर, फलटण) यांच्यावर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व महाराष्ट्र पशु छळ अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्याकडून सुमारे 10 लाख 24 हजारांचा मुद्देमाल फलटण शहर पोलिसांनी हस्तगत केला आहे.
‘फलटण शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेमुळे फलटण शहराच्या वैभवात भर पडलेली आहे. भूमिपूजन करत असलेल्या मलनि:स्सारण केंद्रामुळे फलटण तालुक्यातील शेजारी व सर्वसामान्य नागरिकांना वापरायचे पाणी उपलब्ध होणार आहे,’ असे मत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण शहर व तालुक्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने लॉकडाऊन न करता अन्य उपाययोजना प्रभावीरितीने राबवाव्यात, या प्रमुख मागणीचे निवेदन अ. भा. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष फलटणच्या वतीने प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांना देण्यात आले.
फलटण शहर व तालुक्यातील विकासकामांसाठी नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात तब्बल 274 कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. तर फलटण-सातारा रस्त्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक निधीतून 176 कोटींची तरतूद करण्यात आली असून, यातून या संपूर्ण मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण होणार असल्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
जागतिक महिला दिनानिमित्त फलटण उपविभाग अंतर्गत फलटण शहर पोलीस ठाणे येथे फलटण उपविभाग अंतर्गत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे येथे विभागीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेच्या विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये आढावा बैठक संपन्न झाली.
गेली दोन महिन्यांपासून शहरातील स्वामी विवेकांनद नगर, अनंत मंगल कार्यालय, महाराजा मंगल कार्यालय या भागात मोपेड मोटार सायकलवरून जाणार्या महिला व मुलीच्या हातातील पर्स, अथवा गाडीचे बास्केट, हॅण्डेलला लावलेली पर्स उचलून व जबरदस्तीने हिसकावून जाणार्या एका आरोपीस व त्याकडून मुद्देमाल विकत घेणार्या तीन जणांना अटक करून नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात शहर पोलिसांना यश मिळाले आहे.
तालुक्यातील विविध क्षेत्रांतील वजनदार व धनिकांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग करणार्या ‘हनी ट्रॅप’ टोळीची फलटण तालुक्यामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू असून, पोलीस विभागही यापुढे अशा टोळ्यांवर कारवाई करण्याच्या मनस्थितीत असून गोपनीय पद्धतीने सर्व प्रकारची माहिती घेण्यासही सुरुवात झाली आहे. पुढील काळात निश्चितच या प्रकारच्या टोळ्यांवर कारवाई होणार आहेत.
गेली दोन दिवस अपहरण झाल्यानंतर तपासाचा थरार सुरू होता . त्याची अखेर मात्र वाईट झाली . अवघ्या दहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याचे समोर आल्यानंतर सातारा पोलिस त्या घटनेचा रात्र - दिवस शोध घेत होते .
फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्यांची त्रेधातिरपीट उडाली. हातातोंडाशी आलेल्या ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने यावर्षी शेतकर्याच्या उसाचा तोटा मोठ्या प्रमाणात होणार, त्यामुळे संबंधित विभागाने झालेल्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
‘कोव्हिड-19 या आजाराचा फैलाव खूप झपाट्याने होत असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, त्या प्रमाणामध्ये रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत व काही रुग्णांना जर ऑक्सिजन देण्याची गरज भासली तर तेवढे ऑक्सिजनचे बेड आपल्या फलटणमध्ये उपलब्ध नाहीत.
परीट (धोबी) समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याकरिता सामाजिक न्याय विभाग केंद्र सरकार यांनी पाठवलेल्या प्रपत्रामध्ये राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने विहित प्रपत्रामध्ये राज्य शासनाने माहिती भरून पाठवण्याबाबतचे निवेदन फलटण तालुका व शहर परीट (धोबी) समाजाच्यावतीने उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांना दिले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे कुलूपबंद असल्याने भाविकांना आपल्या आराध्य दैवतांचे दर्शन, भजन, पूजन करणे अवघड झाले आहे. राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे नियमित उघडण्याच्या मागणीसाठी खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण येथे ‘भाजपा’तर्फे ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ अशी हाक देत आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात दि. 18 मार्चपासूनच मंदिरे व सर्व धार्मिक पूजा बंद आहेत.
शेतकर्यांच्या दुधाला आधारभूत भाव, पशुखाद्य किमतीवर नियंत्रण व शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, रासायनिक खते व औषधे यामधील भेसळ व किमतीवर नियंत्रण ठेवण्याबाबत संभाजी ब्रिगेड फलटण तालुक्याच्यावतीने तहसीलदार आर. सी. पाटील यांना निवेदन देण्यात आले.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त फलटण तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी आपल्या समाजाच्या विविध मागण्यांचे रक्ताने लिहिलेले निवेदन प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे दिले.
फलटण नगरपरिषदेमध्ये काम करणार्या दोन सफाई कर्मचार्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने नगरपरिषदेमध्ये एकच खळबळ उडाली असून, फलटण नगरपरिषद कार्यालय चोवीस तासांकरिता बंद करण्यात आले आहे.
फलटण पूर्वभाग हा सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आहे. येथील हनुमंतवाडी, गोखळी ही गावे अनुक्रमे इंदापूर, माळशिरस, बारामती या तालुक्यांच्या सीमा जोडणारी गावे आहेत. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी आदेश जारी केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेचे तंतोतंत पालन करण्याचे महत्त्वपूर्ण काम संबंधित गावातील ग्रामपंचायत व कोरोना समितीने केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाच्या) फलटण तालुक्यातील नूतन कार्यकारिणीच्या निवडी नुकत्याच जाहीर झाल्या असून, यामध्ये ‘रिपाइं’ आठवले गट फलटण तालुकाध्यक्षपदी संजय निकाळजे व फलटण शहराध्यक्षपदी लक्ष्मण अहिवळे यांची बिनविरोध निवड झाली.