जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून दिवसभरात 25 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी दिवसभरात 621 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 19,609 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
सातारा : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून दिवसभरात 25 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी दिवसभरात 621 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 19,609 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
जिल्ह्यात दिवसभरात 252 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 252 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 1007 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
1007 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 10, उपजिल्हा रुग्णालय, कराड 40, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 105, कोरेगाव 46, वाई 62, खंडाळा 135, रायगाव 68, पानमळेवाडी 107, मायणी 89, महाबळेश्वर 70, दहिवडी 43, खावली 40 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 192 अशा एकूण 1007 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.


