जिल्ह्यात दिवसभरात 138 कोरोनाबाधित
गुरुवारी 1 बाधितांचा मृत्यू : 285 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 51,660
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 138 बाधिताची नोंद झाली असून, 1 कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 285 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 138 बाधिताची नोंद झाली असून, 1 कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 285 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात आणखी 285 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 285 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
360 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 20, कराड 21, फलटण 6, कोरेगाव 22, वाई 24, खंडाळा 13, रायगाव 44, पानमळेवाडी 65, महाबळेश्वर 21, दहिवडी 29, खावली 20, मायणी 8, म्हसवड 4, पिंपोडे 4 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 59 अशा एकूण 360 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.