पहिल्या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनी घेतले होते ‘इतके’ मानधन
‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून अमिताभ यांनी बॉलिवूडमध्ये केलं होतं पदार्पण
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ‘बिग बी’ अमिताभ बच्चन वयाच्या ७९ व्या वर्षीही अफलातून अभिनय करताना दिसत आहेत. एका चित्रपटासाठी अमिताभ बच्चन सध्या कोट्यवधी रूपयांचे मानधन घेतात. मात्र, त्यांनी पहिल्या चित्रपटसाठी किती मानधन घेतले होते तुम्हाला माहित आहे का?
मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ‘बिग बी’ अमिताभ बच्चन वयाच्या ७९ व्या वर्षीही अफलातून अभिनय करताना दिसत आहेत. एका चित्रपटासाठी अमिताभ बच्चन सध्या कोट्यवधी रूपयांचे मानधन घेतात. मात्र, त्यांनी पहिल्या चित्रपटसाठी किती मानधन घेतले होते तुम्हाला माहित आहे का? कोट्यवधी रूपयांची कमाई करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांनी पहिल्या चित्रपटासाठी फक्त पाच हजार रूपये मानधन घेतले होते. ही माहिती त्यांनी एका शोमध्ये दिली आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या अनुभवाचा व्हिडीओ अभिनेता शाहरुखने शेअर केला होता. अमिताभ-शाहरूख यांच्यात रंगलेल्या संवादाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे.
‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून अमिताभ यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटासाठी त्यांना फक्त ५ हजार मानधन मिळालं होतं. बॉलिवूडमधील पदार्पणातील आपली ही पहिली कमाई असल्याचे, त्यांनी शाहरूखला या शोमध्ये सांगितलं होतं. अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ आणि ‘प्रतीक्षा’ या बंगल्यांच्या किंमती आजघडीला २०० कोटींपेक्षा जास्त आहे. चित्रपट-जाहिरात क्षेत्रातून कोट्यवधी रूपये कमवणाऱ्या बॉलिवूडच्या महानायकाची पहिली कमाई फक्त ५ हजार रुपयेच होती.
अमिताभ बच्चन मेहनीच्या जोरावर चित्रपट सृष्टीमध्ये यशाच्या शिखरावर पोहचले आहेत. आजही बिग बींनी उतरत्या वयात गुलाबो सिताबो, चेहरे, बह्मास्त्र यांसारख्या चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारताना दिसत आहेत. त्याप्रमाणेच छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातही सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे केवळ अभिनयच नाही तर सर्वच बाजूने अमिताभ परफेक्ट असल्याचं पाहायला मिळतं.