जिल्ह्यात दिवसभरात 817 कोरोनाबाधित
बुधवारी 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू : बळींची संख्या 557; एकूण रुग्णसंख्या 21,347
कोरोनाबाधितांची संख्या सातारा जिल्हावासीयांच्या काळजात धडकी भरवू लागली आहे. बुधवारीदेखील जिल्ह्यात 817 नवे कोरोनाबाधित आढळून आले तर 21 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सातारा : कोरोनाबाधितांची संख्या सातारा जिल्हावासीयांच्या काळजात धडकी भरवू लागली आहे. बुधवारीदेखील जिल्ह्यात 817 नवे कोरोनाबाधित आढळून आले तर 21 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यात आणखी 738 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 738 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून, 960 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
960 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 25, उपजिल्हा रुग्णालय, कराड 21, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 77, कोरेगाव 52, वाई 106, खंडाळा 102, रायगाव 107, पानमळेवाडी 159, मायणी 61, महाबळेश्वर 42, दहिवडी 40 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 168 अशा एकूण 960 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.


