sports

ऐतिहासिक जिल्ह्यात काम करण्याचे भाग्य मला लाभले याचा सार्थ अभिमान वाटतो

अजय बन्सल यांनी व्यक्त केली भावना : आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केले नूतन पोलीस अधीक्षकांचे स्वागत

सातारा हा शूरवीरांचा जिल्हा असून, अशा या ऐतिहासिक जिल्ह्यात काम करण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी आपली भावना व्यक्त केली.

सातारा : सातारा हा शूरवीरांचा जिल्हा असून, अशा या ऐतिहासिक जिल्ह्यात काम करण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी आपली भावना व्यक्त केली.

सातारकरांच्या वतीने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बन्सल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  

नूतन पोलीस अधीक्षक बन्सल यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पोलीस मुख्यालयात जाऊन बन्सल यांची भेट घेतली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारकर आणि तमाम जिल्हावासीयांच्या वतीने बन्सल यांचे स्वागत केले. 

या वेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिल देसाई, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, नगरसेवक अविनाश कदम, बाजार समितीचे चेअरमन विक्रम पवार आदी उपस्थित होते. 

सातारकर हे शांत आणि संयमी म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्ह्यातील जनताही शांत आणि संयमी आहे. तमाम जिल्हावासीयांचे पोलीस प्रशासनाला नेमहीच सहकार्य असते आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वचजण पोलीस प्रशासनाला मदत करत असतात, असे सांगून आ. 

शिवेंद्रसिंहराजे यांनी ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात जनतेच्या वतीने नूतन एसपी बन्सल यांचे स्वागत केले. 

या वेळी सातारा जिल्ह्यातील विविध विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली. या शांतताप्रिय जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतानाच सुशासन आणि लोकाभिमुख कामकाज करू आणि जनतेच्या अपेक्षा सार्थ ठरवू, असे आश्‍वासन बन्सल यांनी याप्रसंगी दिले.