cineworld

लग्नाची पत्रिका छापूनही सलमान खानची पत्नी होऊ शकली नव्हती ही अभिनेत्री, मग क्रिकेटरसोबत केलं लग्न

सलमानला (Samlan Khan) अनेक मुलाखतींमध्ये हा प्रश्न विचारलो जातो आणि सलमान हसत या प्रश्नाचे उत्तर देणे टाळतो.

The actress could not become Salman Khan's wife even after printing the wedding magazine, then got married to a cricketer
सलमानची पन्नाशी पार झाली असली तरी आजही सलमान अविवाहित आहे. सलमानचे सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण आजवर चांगलेच गाजले आहे. संगीता बिजलानी(Sangeeta Bijlani)सोबत सलमान लग्न देखील करणार होता. सलमान आणि संगीताच्या अफेअरची एकेकाळी मीडियात चांगलीच चर्चा झाली होती. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते

सलमानची पन्नाशी पार झाली असली तरी आजही सलमान अविवाहित आहे. सलमानचे सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण आजवर चांगलेच गाजले आहे. संगीता बिजलानी(Sangeeta Bijlani)सोबत सलमान लग्न देखील करणार होता. सलमान आणि संगीताच्या अफेअरची एकेकाळी मीडियात चांगलीच चर्चा झाली होती. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते आणि त्यांनी लग्न करण्याचा देखील विचार केला होता. जसीम खान यांनी सलमान खानच्या आयुष्यावर बीईंग सलमान हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी नमूद केले आहे की, संगीता आणि सलमान 27 मे 1994 ला लग्न करणार होते. पण अचानक त्यांचे लग्न मोडले. संगीता आणि सलमानच्या लग्नाची तयारी देखील सुरू झाली होती. पण त्याचदरम्यान सोमी अली सलमानच्या आयुष्यात आली असल्याचे संगीताला कळले आणि संगीताने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तिने या गोष्टीविषयी अनेक वर्षांनंतर मीडियात कबूल देखील केले होते.
सलमानने देखील ही गोष्ट करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात मान्य केली होती. त्याने सांगितले होते की, त्याचे लग्न ज्या मुलीसोबत ठरले होते, तिला तो फसवतो आहे हे तिला कळल्यामुळे तिने हे लग्न मोडले होते. सलमानसोबत लग्न मोडल्यानंतर काही वर्षांनंतर संगीताने क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनसोबत लग्न केले होते. पण काहीच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. संगीता आणि सलमानच्या ब्रेकअपनंतरही ते दोघे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. सलमानच्या घरातील समारंभात, पार्टींना ती आवर्जून हजेरी लावते.