blogs
संपर्कात आलेल्या लोकांनी कोविड-19 ची टेस्ट करुन घ्यावी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन
सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा कोविड-19 चा रिपोर्ट पॉझिटीव्ह
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची काल कोविड -19 ची चाचणी करण्यात आली होती.त्यांचे रिपोर्ट काल रात्री पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान बाळासाहेब पाटील याची तब्येत ठीक आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहेत. काळजी करण्याची गरज नाही अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जशराज(बाबा) पाटील यांनी दिली. संपर्कात आलेल्या लोकांनी कोविड-19 ची टेस्ट करुन घ्यावी, शिवाय किमान आठवडाभर विलगिकरणात रहावं असे आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.


