संयुक्त कुटुंब व्यवस्था संपल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हालअपेष्टा
वर्तमानकाळातील समाजव्यवस्थेची मोठी समस्या
पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात असल्यामुळे प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आणि सर्व कुटुंबीय गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होते. परंतु सध्या संयुक्त कुटुंब व्यवस्थाच संपल्यामुळे किंवा मोडकळीस आल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. त्यांची काळजी घेणारे कुणीच नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवन जगत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे.
पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात असल्यामुळे प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आणि सर्व कुटुंबीय गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होते. परंतु सध्या संयुक्त कुटुंब व्यवस्थाच संपल्यामुळे किंवा मोडकळीस आल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. त्यांची काळजी घेणारे कुणीच नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवन जगत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. ही
वर्तमानकाळातील समाजव्यवस्थेची सर्वात मोठी समस्या असल्याचे मत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
पूर्वीच्या काळी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये नेहमीच कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची कुटुंबातील सर्व सदस्य नेहमीच काळजी घेत होते. परंतु काळाच्या ओघात आणि संपूर्ण समाजव्यवस्थेमध्ये झालेल्या अमुलाग्र बदलामुळे संयुक्त कुटुंब व्यवस्था हळूहळू संपत गेल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. संयुक्त कुटुंब व्यवस्थाच संपल्यामुळे कुटुंबातील जाणते व तरुण नोकरीधंद्याच्या निमित्ताने आपापल्या मार्गाने विखुरले गेले. मात्र अशा वेळी संयुक्त कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक मात्र आहे त्याच ठिकाणी राहिल्यामुळे त्यांची देखभाल करण्यासाठी संयुक्त कुटुंबातील एकही व्यक्ती नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन व्यतीत करीत असताना अनेक समस्यांना व संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सध्याच्या वर्तमान काळात समाजातील असंख्य ज्येष्ठ नागरिक हे एकट्यानेच जीवन जगत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. संयुक्त कुटुंब व्यवस्था नष्ट पावत चालल्यामुळे त्यांची काळजी घेणारे व त्यांना आधार देणारे अशी कोणीच जवळ नसल्यामुळे सतत चिंतेमध्ये असलेल्या आणि वेगवेगळ्या आजारांचा सामना करीत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यामुळे खूपच एकाकी वाटत आहे. ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे व त्यांना धीर देणे याबाबी सध्याच्या वर्तमानकाळात आणि भविष्यातही अत्यंत महत्त्वाच्या आहेत. परंतु सध्या लोप पावत चाललेल्या संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे आपल्या जवळची किंवा रक्ताच्या नात्याची एकही व्यक्ती आपली काळजी घेण्यासाठी व आपल्याला आधार देण्यासाठी जवळ नसल्यामुळे समाजातील बहुतांशी ज्येष्ठ नागरिक हे हवालदिल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
अनेक ज्येष्ठ नागरिक हे वेगवेगळ्या माध्यमातून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना त्यांचे निवृत्ती वेतनही मिळत असते. त्यांच्याकडे जगण्या पुरते आर्थिक पाठबळ असते. त्यांना स्वतःच्या मुलाबाळाकडून पैशाची अपेक्षा नसते, आमच्याच सेवानिवृत्तीच्या या पैशांच्या मदतीने कुटुंबातील जाणत्या व तरुण सभासदांनी आमची उतरत्या वयात वैयक्तिक काळजी घेऊन मानसिक आधार देणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी बोलून दाखविले.
दुर्दैवाने ज्येष्ठ नागरिकांच्या उतरत्या वयात त्यांना शारीरिक व मानसिक आधाराची अत्यंत आवश्यकता असताना समाजातील बहुतांशी घरामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची आपत्ते याच्यामध्ये भावनिक व जिव्हाळ्याचे नाते निर्माण होण्याऐवजी वैयक्तिक हव्यासापोटी व हेवेदाव्यापोटी दैनंदिन जीवनात वारंवार वाद व खटके उडत असतात. यामुळे बहुतांशी जेष्ठ नागरिक हे मानसिक दृष्ट्या खचून जातात. अशावेळी कुटुंबातील जाणत्या व तरुण सभासदांनी ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे व त्यांना मानसिक व शारीरिक आधार देणे ही काळाची गरज असल्याचे मत सामाजिक समस्यांचा अभ्यास करणाऱ्या समाजिक तज्ञांनी व्यक्त केले आहे.