सातारा जिल्ह्यात मनसेचा वारू रोखणार कोण?
मनसे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करते य पदाधिकारी-कार्यकर्त्यांची भक्कम फळी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या छत्रपतींच्या राजधानीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचै शिलेदार युवराज पवार हे तसे पाहायला गेले तर मितभाषी व्यक्तिमत्व. मात्र याच व्यक्तिमत्त्वाने राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या जबाबदारीची जाण ठेवून सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोपट्याचा वटवृक्ष करून दाखवण्याची किमया केली आहे.
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या छत्रपतींच्या राजधानीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचै शिलेदार युवराज पवार हे तसे पाहायला गेले तर मितभाषी व्यक्तिमत्व. मात्र याच व्यक्तिमत्त्वाने राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या जबाबदारीची जाण ठेवून सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोपट्याचा वटवृक्ष करून दाखवण्याची किमया केली आहे.
तसे पाहायला गेले तर सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून संबोधला जातो. मात्र त्याला छेद देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी मनसेच्या झेंड्याखाली पदाधिकारी कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी केली आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर प्रेम करणारे व राजसाहेब ठाकरे यांच्याशी मनापासून निष्ठा ठेवणारे युवराज पवार हे मनसेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची व त्याच्या कामाची दखल घेतात. एवढे करून न थांबता पदाधिकारी -कार्यकर्त्यांची कामे ते राज साहेबांपर्यंत पोहोचवतात.
गोरगरीब, शोषित, वंचित, जात, पात, लिंग हा भेदाभेद न करता युवराज पवार आपल्या कार्यालयात आलेल्या सर्वजणांची कामे अगदी आपल्या घरातले काम आहे असे समजून करून देतात. त्यांच्या या कार्याच्या पाठीमागे फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरे यांचेच मोलाचे शब्द असतात हे कोणास सांगण्याची गरज नाही. फक्त आपुलकीच्या नात्यावर जगणारा हा कार्यकर्ता कोणतेही पद मिळो अथवा न मिळो सर्वार्थाने मनसैनिक हे पद भूषवणारा निष्ठावंत कार्यकर्ताच म्हणावे लागेल. युवराज पवार आपल्या मित्रमंडळींना नेहमीच सांगतात की, आई-वडिलांनी मला जन्म दिला. परंतु कार्यकर्तृत्व घडवण्याचे काम मी राज साहेब ठाकरे आणि शर्मिला वहिनी यांच्याकडून शिकलो. आयुष्यात उतराई व्हायची संधी देवाने मला द्यावी, अशी भावनिक सादही ते नेहमी घालत असतात. आपल्याकडे आलेल्या कोणत्याही गरजवंताचे काम करून देऊन मिळालेले समाधान हे सागरापेक्षा मोठे असल्याचे ते आत्मीयतेने सांगतात सर्वसामान्य मनसैनिक जे पक्षासाठी काम करतात ते राज साहेब ठाकरे यांच्या पर्यंत पोहोचलेच पाहिजे त्यांना आपल्या नेत्याबद्दल आपुलकी वाटली पाहिजे याबाबत युवराज पवार हे सदैव प्रयत्नशील असतात.
सामाजिक जीवनात काम करीत असताना युवराज पवार यांनी हरतरेच्या चळवळी उभ्या करून जनतेची सेवा करण्याचे काम केले आहे. वेळप्रसंगी जेलचीही तमा न बाळगणारा हा शिलेदार प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सांगलीच्या तानाजी सावंत यांच्याकडे सोपवण्यात यावी. आम्ही त्यांना सहकार्य करू व सातारा जिल्हा आम्ही सांभाळू, असे ते अतिशय विनयशीलतेने सांगतात.
विद्यार्थी दशेत असताना हिंदुहृदयसम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करीत होते. परंतु ९ मार्च 2006 रोजी राजसाहेब ठाकरे यांनी मनसे हा पक्ष स्थापन केला. त्याचवेळी युवराज पवार यांनी राजसाहेब ठाकरे यांचे विचार आपल्या मनी रुजवले आहेत. राजसाहेबांच्या आदेशाने साताऱ्यात जेथे कोठे गैरव्यवहार- दहशतवादी कारवाया चालू आहेत, याची माहिती घेण्याचे काम युवराज पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. याबाबतची सर्व माहिती पोलीस महासंचालक व गृहमंत्री यांना युवराज पवार देणारच आहेत. याचबरोबर जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता यावे, प्रशासकीय सेवेचा अभ्यास करता यावा यासाठी एम पी एस सी व यूपीएससीची सर्व पुस्तके उपलब्ध करून देण्यात आले आहेत याचाही लाभ तरुणांनी घेऊन सातारचे नाव उंच व्हावे अशी इच्छा युवराज पवार यांनी व्यक्त केली.
उभ्या महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा डौलाने फडकावा आणि भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य यावे यासाठी महाराष्ट्रातील अबाल-वृद्धांसह माता-भगिनींनी राजसाहेबांना शुभाशीर्वाद द्यावेत, हीच तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राजसाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र सर्वांनी मिळून घडवूयात, याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापनदिनी हार्दिक शुभेच्छा...!