sports

जिल्ह्यात दिवसभरात 32 कोरोनाबाधित

शनिवारी 11 बाधितांचा मृत्यू : 150 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 47,786

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 32 बाधितांची नोंद झाली असून, 11 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 150 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सातारा : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 32 बाधितांची नोंद झाली असून, 11 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 150 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

जिल्ह्यात आणखी 150 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 150 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

211 जणांचे स्त्राव तपासणीला 
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 18, कराड 10, कोरेगाव 34, वाई 15, खंडाळा 8, रारगाव 37, पानमळेवाडी 4,  मारणी 10, महाबळेश्‍वर 1, दहिवडी 4, खावली 3, म्हसवड 24 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड रेथील 43 अशा एकूण 211 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.