sports

पाचगणी पोलिसांची विनाकारण फिरणार्‍या सुमारे एक हजार जणांवर कारवाई

2 लाख 63 हजारांचा दंड वसूल

राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पाचगणी पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने विनाकारण बाहेर पडणारे, सामाजिक नियमांचे पालन न करणार्‍या बेजबाबदार सुमारे एक हजार दोन व्यक्तींवर गुन्हा नोंदवत 2 लाख 63 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला.

पाचगणी : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पाचगणी पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने विनाकारण बाहेर पडणारे, सामाजिक नियमांचे पालन न करणार्‍या बेजबाबदार सुमारे एक हजार दोन व्यक्तींवर गुन्हा नोंदवत 2 लाख 63 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला.
ही कारवाई पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ. ए. एस. माने, हे. कॉ. पी. एस. महांगडे, पो. ना. एस. एस. गवळे, एस. डी.शेळके, पो. कॉ. टी. ए. जगताप, कीर्तीकुमार कदम यांनी 22 मार्च ते 10 ऑगस्ट दरम्यान केली असून, यामध्ये विना मास्क 36 केसेस 18 हजार, मोटार वाहन कायद्यानुसार 951 केसेस 2 लाख 30 हजार 700, डबल सीट 15 केसेस 15 हजार असा एकूण 2, 63, 700 दंड वसूल केला आहे.