कोरोनाची बोगस चाचणी करून लुबाडणूक; मल्हारपेठ येथील डॉक्टरसह लॅब मालकावर गुन्हा
डॉक्टर फरार, तर एकास अटक; जिल्ह्याचा आरोग्य विभाग हादरला
By esahas.com web team Mon 29th Mar 2021 11:31 am
मल्हारपेठ, ः कोरोना चाचणी करण्याचा कोणताही कायदेशीर परवानगी नसताना चुकीच्या पध्दतीने चाचण्या करून रुग्णांना लुबाडण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील डॉक्टरसह लॅब मालकावर गुन्हा नोंद झाला असून लॅब मालकास अटक करण्यात आले आहे तर संबंधित डॉक्टर फरार असल्याची माहिती मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी दिली. दरम्यान या घटनेने जिल्ह्यातील आरोग्य विभाग चांगलाच हादरला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील नवसरी येथील दत्तात्रय राजाराम उदुगडे यांनी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात एक तक्रार दिली होती. संबंधीत हॉस्पिटलचे डॉ. वनारसे व यशवंत लॅबोरोटरीज् मालक अनिल ईनामदार यांनी माझ्या संमतीविना रक्त चाचणी केली. सदरची रक्त चाचणी करण्याचे कोणतीही कायदेशीर परवानगी दोघांनी घेतली नाही. सदरच्या चाचण्या करण्याचा यशवंत लॅबोरोटरीजला परवानगी नाही. तरी सध्दा माझी रक्त चाचणी करुन कोव्हिड अॅन्टीबॉर्ड चाचणी निगेटेव्ह असताना त्यांना कोरोना पॉझिटेव्ह सांगितले यामुळे त्यांच्या कुटुबियात मृत्यृची भिती निर्माण झाली, मानसिक त्रास झाला संबंधीत हॉस्पिटलचे डॉ.वनारसे व यशवंत लॅबोरोटरीजचे मालक अनिल ईनामदार यांचेवर चुकीचे रक्त चाचणी करण्यास प्रवृत करणे रक्त चाचणी करणे, चुकीचा अहवाल व सल्ला देणे, तसेच कोव्हिड अॅन्टीबॉर्डज् चाचणी करण्यासाठी लागणार्या किटचा काळाबाजार करणे. याबाबत सखोल चौकशी व्हावी व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली होती. यासंदर्भात मल्हारपेठ पोलिसांनी कसून चौकशी केली असता संबंधित लॅब मालक इनामदार हे बेकायदेशीर लॅब चालवीत असून तक्रारदारांचीही फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार लॅब धारक आणि संबंधित डॉक्टर विरोधात मल्हारपेठ पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेतील संशयित आरोपी आणि लॅब मालक इनामदार याला अटक करून सोमवारी पाटण न्यायालयासमोर उभे केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे मात्र या घटनेतील दुसरा संशयित आरोपी डॉक्टर वनारसे हे फरार असून लवकरच त्यांना ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी दिली. दरम्यान लॅब मधील बेकायदेशीर साहित्य पोलिसांनी जप्त केले असून लॅब सील केली असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली.