sports

जिल्ह्यात दिवसभरात 42 कोरोनाबाधित

रविवारी 6 बाधितांचा मृत्यू : 31 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 48,850

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 42 बाधितांची नोंद झाली असून, 6 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 31 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सातारा : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 42 बाधितांची नोंद झाली असून, 6 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 31 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

जिल्ह्यात आणखी 31 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 31 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

29 जणांचे स्त्राव तपासणीला 
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 15 व खंडाळा येथील 14 अशा एकूण 29 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.