तालुक्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मेढा येथे वाद झाला. मतदान केंद्रावर वाद झाल्यानं या ठिकाणी काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणाव कायम आहे.
वारूंजी, ता. येथे खासगी व्यवहारातून आर्किटेक्टला मारहाण झाल्याप्रकरणी शनिवारी 20 रोजी सात जणांना अटक करण्यात आली. सायंकाळी त्यांना न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर झाला. याप्रकरणात नितीन छाजेड यांना कोणतीही मारहाण झालेली नाही.
प्रफुल्लकुमार भीमराव सरगडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गोडोली येथील विजय साई प्राईडमध्ये त्यांच्या फ्लॅट असून गुरुवारी सकाळी आठ ते दुपारी सव्वातीन वाजण्याच्या दरम्यान, चोरट्यांनी तो फोडला आणि येथून ३७ हजारांचा ऐवज चोरीला गेला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील सर्वाधिक हॉट झालेल्या ‘जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा’ मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादीचे नेते आ. शशिकांत शिंदे यांना सोपी करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले. ‘बाबा तुमच्यासाठी काहीही करु; पण आता माघार घेणार नाही.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण आणि कचरामुक्त शहरे या सर्वेक्षणात सातारा पालिकेचा शनिवारी दिल्ली येथील विज्ञान भवनामध्ये आयोजित कार्यक्रमात गौरव झाला. केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे मुख्य सचिव दुर्गशंकर मिश्रा यांच्या हस्ते पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी कचरामुक्त शहराचा विशेप सन्मान स्वीकारला.
मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहलायाची नवीन वास्तू सुसज्ज अशी आहे. त्याच इमारतीत हे संग्रहालय सुरु व्हावे. अशी मनोमन इच्छा आम्हा शिवभक्तांची आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर नव्या इमारतीचे हस्तांतरण करावे, जेणेकरुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या या संग्रहालयाला चांगले दिवस येतील.
हिवाळा हा खाण्यापिण्यासाठी उत्तम मानला जातो. या हंगामात भरपूर ताज्या हिरव्या पालेभाज्या हि बाजारामध्ये मिळतात, ज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये पालक ही पालेभाजीची महत्वाची आहे.
महामार्ग निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. त्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी संसदेच्या अधिवेशनात केली होती. मात्र यावर पुढे काहीच कार्यवाही न झाल्याने या भ्रष्टाचाराची पाळेमुळे आणखी खोल होत गेली आहेत. या भूसंपादनात चक्क भूसंपादन अधिकाऱ्याकडून सेटलमेंटसाठी शेतकऱ्यांकडून ४ टक्के कमिशनची मागणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
माण-खटाव तालुक्यात वाळूचोरी जोमात सुरु असून याबाबत अनेकवेळा माध्यमांनी प्रशासनाला जागे करुन कारवाई करण्यास भाग पाडले आहे. या वाळू माफियांना धैर्य देण्यात जो अग्रभागी होता, त्याच्यावरच काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाल्याने अधिकार्यांवर कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र यातील काही अधिकार्यांचे मात्र शील ढासळत असल्याचे चित्र आहे.
पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील कराड-चिपळूण हा रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा हा महात्वाकांशी प्रकल्प होता. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कराडला या प्रकल्पाचे भुमिपुजनही केले. तसेच राज्य सरकारने यातील 50 टक्के खर्च उचलण्याचे मान्य केले. परंतु, भाजपने समृद्धी महामार्गासाठी कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प रद्द केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.