बेताल वक्तव्य करुन देशाचा व देशासाठी बलिदान दिलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या बद्दल अविचारी, अनैतिक व अवमानकारक अपशब्द वक्तव्य करणाऱ्या कंगणा राणावत हिच्या विरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व खटाव तालुका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहनराव जाधव यांनी पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांना दिले.
एस. टी. महामंडळाचे राज्य शासनाने विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एस. टी. कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपासले आहे. या संपाचा आज अकरावा दिवस आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय सुरुच असली तरी विविध गावांनी व संघटनांनी या संपास लेखी पाठींबा दिला आहे.
दि. १७ रोजी रात्री साडेसात वाजता एकूण सहा संशयितांनी त्यांच्या घराजवळ आरडाओरडा केला. यावेळी तक्रारदार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी ओरडू नका, असे म्हटल्याच्या कारणातून चिडून जावून तक्रारदार, त्यांचे वडील, आई तसेच भांडणे सोडवायला आलेल्या परिसरातील नागरिकांनी मारहाण करत दमदाटी केली. संशयितांनी ही मारहाण लाकडी दांडके व दगडाने केली आहे.
ओएलक्सवर फ्लॅट भाड्याने देणे आहे, अशी जाहिरात करून फ्लॅट भाड्याने देण्याऐवजी आपल्याच बँकेच्या खात्यातून ६० हजार रुपये गेल्याने घरमालकाला मनस्ताप सहन करावा लागला. ही घटना साताऱ्यातील गोडोली येथे घडली असून, याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सातारा जिल्ह्यातील वाई हत्याकांडात माफीची साक्षीदार झालेल्या ज्योती मांढरेने गुरुवार दि.१८ रोजी सातारा जिल्हा न्यायालयात महत्वाची साक्ष दिली आहे. संतोष पोळनेच माझ्यासमोर तीन खून केल्याची साक्ष ज्योती मांढरेने दिली असून आपले पोळ याच्यासोबत मंदिरात लग्न झाल्याचंही ज्योती मांढरेने सांगितले आहे.
सातारा तालुक्यातील शेरेवाडी येथे बांधलेला गोठा पाडण्यात आल्याने, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून देखील न्याय मिळत नसल्याने सचिन वामन स्वामी या युवकाने गुरुवार दि.१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वतःवर ज्वलनशील द्रवपदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.
आर्थिक कारणावरुन आर्किटेक्टसह अन्य दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंचायत समिती नामदेव पाटील यांच्यासह सुमारे दहा जणांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत आर्किटेक्ट जितेंद्र पारसमल भंडारी रा. कोयना कॉलनी, शनिवार पेठ, कराड यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सातारा परिसरातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याच्या तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत.
नॅशनल क्रेडिट कार्ड डिपार्टमेंट म्हणून बोलत असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी तमन्ना शर्मा या परप्रांतीय महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर देशातील शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही आता आपले आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करत कृषी कायदे रद्ध झाल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला असल्याचे मत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.