maharashtra

सदरबझार येथे राडा : सहा जणांवर गुन्हा


Radha at Sadarbazar: Crime against six persons
दि. १७ रोजी रात्री साडेसात वाजता एकूण सहा संशयितांनी त्यांच्या घराजवळ आरडाओरडा केला. यावेळी तक्रारदार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी ओरडू नका, असे म्हटल्याच्या कारणातून चिडून जावून तक्रारदार, त्यांचे वडील, आई तसेच भांडणे सोडवायला आलेल्या परिसरातील नागरिकांनी मारहाण करत दमदाटी केली. संशयितांनी ही मारहाण लाकडी दांडके व दगडाने केली आहे.

सातारा : येथील सदरबझार येथे बुधवार दि.१७ रोजी  रात्री झालेल्या राड्याप्रकरणी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, संशयितांनी घरात घुसून जबरी चोरी, मारहाण करत वाहनाची तोडफोड केल्याचे तक्रारीत म्हटले आह.
ऋत्वीक अजय जाधव (वय १९), शुभम अजय जाधव (वय २0), गणेश विलास चव्हाण वय (२0), तिघे रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा असे संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी श्रीधर अशोक कोळी वय २५, रा.लक्ष्मी टेकडी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.
दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. १७ रोजी रात्री साडेसात वाजता एकूण सहा संशयितांनी त्यांच्या घराजवळ आरडाओरडा केला. यावेळी तक्रारदार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी ओरडू नका, असे म्हटल्याच्या कारणातून चिडून जावून तक्रारदार, त्यांचे वडील, आई तसेच भांडणे सोडवायला आलेल्या परिसरातील नागरिकांनी मारहाण करत दमदाटी केली. संशयितांनी ही मारहाण लाकडी दांडके व दगडाने केली आहे.
दरम्यान, यावेळी संशयितांनी तक्रारदार यांच्या घरातील आईच्या गळ्यातील ४७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, इतर दागिने व रोख ५ हजार रुपये असा ऐवज जबरदस्तीने चोरला. संशयितांनी कुटुंबियांना मारहाण केल्याने या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करत तत्काळ त्यांना अटक केली.