maharashtra

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी परप्रांतीय महिलेवर गुन्हा


Crime against a foreign woman for financial fraud
नॅशनल क्रेडिट कार्ड डिपार्टमेंट म्हणून बोलत असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी तमन्ना शर्मा या परप्रांतीय महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : नॅशनल क्रेडिट कार्ड डिपार्टमेंट म्हणून बोलत असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी तमन्ना शर्मा या परप्रांतीय महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 नोव्हेंबर रोजी 7.30 ते 7.45 वाजण्याच्या दरम्यान पंकज पांडुरंग जाधव, वय 39, रा. दुर्वांकुर बंगला, यशवंत कॉलनी, गोडोली, सातारा यांना तमन्ना शर्मा नावाच्या एका परप्रांतीय महिलेचा मोबालवरून फोन आला. तिने जन्मतारीख, पत्ता विचारून त्यांचा विश्वास संपादन केला. दरम्यान क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने तिने 99 हजार 960 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.