maharashtra

कृषी कायदे रद्ध झाल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

Ordinary farmers get justice due to repeal of Agriculture Act: Co-operation Minister Balasaheb Patil

केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर देशातील शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही आता आपले आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करत कृषी कायदे रद्ध झाल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला असल्याचे मत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

कराड : केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर देशातील शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही आता आपले आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करत कृषी कायदे रद्ध झाल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला असल्याचे मत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
मोदी सरकारने तीन कृषी कायदे रद्ध केल्याने देशभरातून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयाबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना विचारले असता कराड येथे माध्यमांशी त्यांनी संवाध साधला.
सहकारमंत्री पाटील म्हणाले, केंद्र सरकारने मागच्या वर्षी तीन कृषी कायदे हे लागू केले होते. त्यामुळे या देशांमध्ये भांडवलशाही वाढते की काय? अशी परिस्थिती होती. मी या विभागाचा सहकार व पणन मंत्री आहेत. त्याअंतर्गत मार्केट कमिटीचा जो कायदा आहे, त्यामध्ये त्यांनी काही निर्बंध लावले होते. किंवा त्यामध्ये काही सुधारणा केली होती. सध्याच्या प्रचलित परिस्थितीमध्ये शेतकरी मार्केटमध्ये माल घेऊन येतो. कारण त्याला विश्वास असतो इथला व्यापारी, अडत्या आमच्या मालासाठी योग्य रक्कम देईल.
या नवीन कायद्यामध्ये एपीएमसीच्या बाहेरच्या आवारात सुद्धा व्यवसाय करायची परवानगी होती. एवढेच नव्हे तर त्याच्या लायसन्स बाबतीतही कोणतेही निर्बंध नव्हते. आणि म्हणून राज्य सरकारने या कायद्यांना विरोध केला होता. तसेच नवीन कायदा करण्यासाठी मंत्रीगण स्थापन केला. दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकारने हे तीन कृषी कायदे रद्द केले आहेत. त्यामुळे देशातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळाला असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.