केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 आणि कचरामुक्त शहरे सर्वेक्षणमध्ये जिल्ह्यातील कराड आणि पाचगणी या शहरांनी बाजी मारली आहे. या शहरांना स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत देशपातळीवर पुरस्कार जाहीर झाला.
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आज साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करत साखर वाटून आपला आनंद साजरा केला. येथील सेव्हन स्टार चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार घोषणाबाजी केली.
मालखेड, ता. कराड येथे बुधवार दि. 17 रोजी कृष्णा नदीपात्रात एक पुरुष जातीचा मृतदेह पोत्यात भरलेल्या अवस्थेत आढळला होता. हा घातपाताचा प्रकार असून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पोत्यात भरून पाण्यात टाकल्याचे निदर्शनास आले. परंतु, मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटू शकली नाही.
रांजणे हे माझ्या बरोबरच आहेत. त्यांच्या पत्नीही राष्ट्रवादीमध्ये आहेत. इच्छुक असणे हा काही गुन्हा नाही. मात्र, गैरसमजातून हा विषय पुढे गेला असला, तरी एक-दोन दिवसात हा विषय मार्गी लागेल, असा विश्वास आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना व्यक्त केला.
मुख्यतः यापूर्वी कारखान्यास उत्तम ऊस विकास पुरस्कार, उच्च तांत्रिक क्षमता पुरस्कार, उत्तम आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार देवून नॅशनल फेडरेशन ऑफ को- ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज ने अनेकवेळा सह्याद्रि कारखान्याचा गौरव केलेला आहे. तर राज्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे यांनीही उत्तम आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार देवून कारखान्यास सन्मानित केले आहे.
कराड नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान 2022 व स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत सामाजिक संस्था व वैयक्तिक नागरिकांसाठी भव्य वृक्षसंवर्धन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा कालावधी दि. 15 नोव्हेंबर ते 5 मे 2022 पर्यंत असणार आहे.
भारत सरकार सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय विकलांग व्यक्ती विभागाकडून दिव्यांग व्यक्तींकरिता महत्वाच्या सहा शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित केल्या आहेत. या केंद्रीय शिष्यवृत्तीसाठी इ. 9 वी ते महाविद्यालयीन विभागात शिक्षण घेणारे दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून संबंधित संस्थांनी दि. 15 डिसेंबर पर्यंत अर्ज पडताळणी करणे आवश्यक आहे.
छत्रपती शिवराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे जावळी तालुका होय. या जावली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मेढा नगरीचे नगरसेवक जेष्ठ पत्रकार शशिकांत गुरव यांची निवड करण्यात आली. तर कुढाळचे कार्याध्यक्ष इम्तियाज मुजावर, उपाध्यक्ष कासचे सूर्यकांत पवार व आनेवाडीचे शहाजी गुजर, सचिव धनंजय गोरे यांची निवड करण्यात आली.
महाविद्यालयातील एकही पात्र विद्यार्थी मतदार नोंदणी पासून वंचित राहणार नाही यासाठी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विशेष शिबीरांचे आयोजन करावे. या शिबीरांमध्ये जास्तीत जास्त व्होटर हेल्पलाईन ॲपचा वापर करुन नव मतदारांची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
मौजे पार्ले, ता. कराड येथील स्मशानभूमी सुशोभिकरण करण्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा योजनेमधून ४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.