Satara

esahas.com

वाहकास मारहाणप्रकरणी एकावर गुन्हा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागीय एसटी कार्यालयासमोर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मात्र, हा संप सूरु असताना वाहक राजेंद्र बाबूराव पवार (वय ५३, रा. १७२, यादोगोपाळ पेठ, सातारा) हे कर्तव्यावर हजर झाले.

esahas.com

शुक्रवार पेठेत महिलेस मारहाण

मनिषा अरुण धनवडे (वय ३१, रा. ९८, शुक्रवार पेठ, सरपंच मारुती मंदिराच्या समोर, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मनिषा या दि. १६ रोजी राहत्या घरी जेवण बनवत असताना तिथे असिया मोईन शेख यांनी अनाधिकाराने प्रवेश केला आणि घर खाली करण्याची धमकी देवून, मनिषा यांच्या गालाखाली चापट मारली.

esahas.com

मोक्का केसमधील फरारी आरोपीस पुणे येथून अटक

16 फेब्रुवारी 2019 रोजी नाईकनवरे याने एकाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. नाईकनवरे व त्याच्या साथीदारांवर चोरी, रॉबरी व मारामारीचे गुन्हे दाखल होते. तो आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का अर्तगत कारवाई करण्यात आली होती. अत्यंत सराईत गुन्हेगार हा गेल्या दोन वर्षापासून फरार होता.

esahas.com

मालखेडमध्ये नदीपात्रात पोत्यात आढळला मृतदेह

बुधवारी दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास काही युवक कृष्णा नदीपात्रात मच्छीमारी करत होते. यावेळी त्यांना नदीपात्रालगत पोत्यात भरलेला सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. परिसरात त्यांची मोठी दुर्गंधी पसरल्याने त्यांच्या ही बाब प्रखार्षाने निदर्शनास आली.

esahas.com

युवकांनी मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन

मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली असून या मतदार यादीत आपले नाव असल्याचे नागरिकांनी खात्री करुन घ्यावी. तसेच व्होटर हेल्पलाईन या ॲपचा वापर करुन युवकांनी मतदार यादित नाव येण्यासाठी ॲपवर नाव नोंदणी करावी व मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा.

esahas.com

दौलतनगर येथील ध्वजाचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर (मरळी) येथे उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभ आणि ध्वजाचे लोकार्पण नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई याची प्रमुख उपस्थिती होती.

esahas.com

मेढा डेपोतील एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

साताऱ्यातील मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्याचा मागील दहा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. असे असतानाच सातारा जिल्ह्यातील मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

esahas.com

दिल्लीत मान्यवरांच्या हस्ते 'अजिंक्यतारा'चा गौरव

नॅशनल फेडरेशन न्यू दिल्ली, या राष्ट्रीय स्तरावरील केंद्रीय शिखर संस्थेकडून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास जाहीर झालेला 'हायस्ट शुगर रिकव्हरी इन हाय रिकव्हरी एरीया' इफिशियन्सी पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे- पाटील, आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

esahas.com

जिल्हा पोलीस दलातील जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

सातारा जिल्हा पोलीस दलातील निलेश गौतम बच्छाव (रा. बसापा पेठ, सातारा) या अवघ्या २९ वर्षीय पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. काल पीटी परेड झाल्यानंतर त्यांना छातीत दुखू लागल्याने खासगी रुग्णालामध्ये दाखल करण्यात आले होते.

esahas.com

धोकादायक चौकात बसवले कॉनव्हॅक्स मिरर

नगरसेवक सुहास जगताप यांच्या कल्पनेतून सोमवार पेठेतील 15 धोकादायक चौकांमध्ये कॉनव्हॅक्स  मिरर (बर्हिवर्क आरसे) बसवण्यात आले आहेत. या कॉनव्हॅक्स  मिररमुळे अंतर्गत रस्त्यावरील धोकादायक चौक व वळणावर होण्याऱ्या अपघातांना आळा बसणार असून त्यांच्या या संकल्पनेचे सोमवार पेठेसह शहरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे.