साताऱ्यातील मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्याचा मागील दहा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. असे असतानाच सातारा जिल्ह्यातील मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
सातारा : साताऱ्यातील मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्याचा मागील दहा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. असे असतानाच सातारा जिल्ह्यातील मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. संतोष वसंत शिंदे (वय-34, रा. आसगाव, ता. सातारा) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील आसगाव येथील संतोष शिंदे तीन वर्षापासून मेढा एसटी डेपोमध्ये सेवा बजावत आहेत. त्यांची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. अशातच लॉकडाऊन लागले, त्यानंतर आता संप सुरू झाला. यामुळे तटपुंज्या पगारात जगायचे कसे, या विचाराने संतोष हताश झाले होते. अशातच गेल्या आठ दिवसापासून ते तणावाखाली होते. तटपुंजा पगार व संपामुळे संतोष शिंदे तणावाखाली होते, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
काल (मंगळवार) मध्यरात्री त्यांना त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तात्काळ सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुर्दैवाने मात्र त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, आई, वडील, दोन लहान भाऊ असा परिवार आहे.