maharashtra

मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा


Attempt to dispose of dead body
मालखेड, ता. कराड येथे बुधवार दि.  17 रोजी कृष्णा नदीपात्रात एक पुरुष जातीचा मृतदेह पोत्यात भरलेल्या अवस्थेत आढळला होता. हा घातपाताचा प्रकार असून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पोत्यात भरून पाण्यात टाकल्याचे निदर्शनास आले. परंतु, मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटू शकली नाही.

कराड : मालखेड, ता. कराड येथे बुधवार दि.  17 रोजी कृष्णा नदीपात्रात एक पुरुष जातीचा मृतदेह पोत्यात भरलेल्या अवस्थेत आढळला होता. हा घातपाताचा प्रकार असून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पोत्यात भरून पाण्यात टाकल्याचे निदर्शनास आले. परंतु, मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटू शकली नाही. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी पोलिसांच्या वतीने अज्ञाताविरोधात फिर्याद दिली असून त्यानुसार कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या पूर्वी मालखेड येथील कृष्णा नदीपात्रात मार्तंडेश्वर घाटालगत संशयास्पदरित्या पोत्यात काहीतरी बांधल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, पोत्यामध्ये अंदाजे ३०-३५ वर्षाच्या पुरुष जातीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. परंतु, मृतदेह पूर्णपणे सडलेला असल्याने त्याची ओळख पटू शकली नाही. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून अज्ञाताचा मृत्यू कशामुळे झाला असावा व त्याच्या अंगावर काही जखमा आहेत का? याची खातरजमा करण्यासाठी वेणूताई चव्हाण शासकिय उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. त्यामध्ये ठोस माहिती समोर आली नाही.
त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असून अज्ञाताने मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पोत्यात भरून पाण्यात टाकल्याचा अंदाज व्यक्त करून, पोलिसांनी अज्ञाताविरोधात कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.