मालखेड, ता. कराड येथे बुधवार दि. 17 रोजी कृष्णा नदीपात्रात एक पुरुष जातीचा मृतदेह पोत्यात भरलेल्या अवस्थेत आढळला होता. हा घातपाताचा प्रकार असून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पोत्यात भरून पाण्यात टाकल्याचे निदर्शनास आले. परंतु, मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटू शकली नाही.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!