रांजणे हे माझ्या बरोबरच आहेत. त्यांच्या पत्नीही राष्ट्रवादीमध्ये आहेत. इच्छुक असणे हा काही गुन्हा नाही. मात्र, गैरसमजातून हा विषय पुढे गेला असला, तरी एक-दोन दिवसात हा विषय मार्गी लागेल, असा विश्वास आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना व्यक्त केला.
कराड : रांजणे हे माझ्या बरोबरच आहेत. त्यांच्या पत्नीही राष्ट्रवादीमध्ये आहेत. इच्छुक असणे हा काही गुन्हा नाही. मात्र, गैरसमजातून हा विषय पुढे गेला असला, तरी एक-दोन दिवसात हा विषय मार्गी लागेल, असा विश्वास आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना व्यक्त केला.
येथील राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
आ. भोसले म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सहकार पॅनेलच्या कोणत्याही जागांना काहीही अडचण येणार नाही. काही उमेदवार बिनविरोध झाले असून उर्वरित उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील. जावळी तालुक्यातीलही मतदान सहकार पॅनेलला होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.