maharashtra

सह्याद्रि`चा सर्वाधिक साखर निर्यातीबद्दल देशपातळीवर पुरस्काराने गौरव

दिल्‍ली येथे पुरस्‍कार वितरण समारंभ संपन्न

Sahyadri honored with national award for highest sugar export
मुख्यतः यापूर्वी कारखान्यास उत्‍तम ऊस विकास पुरस्‍कार, उच्च तांत्रिक क्षमता पुरस्‍कार, उत्‍तम आर्थिक व्यवस्‍थापन पुरस्‍कार देवून नॅशनल फेडरेशन ऑफ को- ऑपरेटीव्ह शुगर फॅक्‍टरीज ने अनेकवेळा सह्याद्रि कारखान्याचा गौरव केलेला आहे. तर राज्‍यातील वसंतदादा शुगर इन्स्‍टिट्यूट, पुणे यांनीही उत्‍तम आर्थिक व्यवस्‍थापन पुरस्‍कार देवून कारखान्यास सन्मानित केले आहे.

कराड : देशातील सहकारी साखर उद्योगाला मार्गदर्शन करणार्‍या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लि. नवी दिल्ली या संस्थेकडून देशभरातून जास्तीत जास्त साखर निर्यात केल्याबद्दल सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास सन 2019-20 आणि 2020-21 या दोन्ही वर्षांकरिता द्वितीय क्रमांकाचे दोन स्‍वतंत्र पुरस्‍कार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, माजी केंद्रिय कृषीमंत्री खासदार शरद पवार, महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, फेडरेशनचे उपाध्यक्ष केतनभाई शाह यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्‍थितीमध्ये दिल्‍ली येथे समारंभपूर्वक सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास प्रदान करण्यात आले.
पुरस्‍कार कारखान्याच्यावतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, फायनान्सिअल ॲडव्हायझर एच.टी.देसाई, डे.चीफ अकौन्टंट बी.जी.कुंभार यांनी स्‍विकारले. कारखान्यास सलग दुसऱ्या वर्षी साखर निर्यात पुरस्कार मिळाल्‍याबद्दल कारखान्याचे चेअरमन राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील व संचालक मंडळाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.