प्रफुल्लकुमार भीमराव सरगडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गोडोली येथील विजय साई प्राईडमध्ये त्यांच्या फ्लॅट असून गुरुवारी सकाळी आठ ते दुपारी सव्वातीन वाजण्याच्या दरम्यान, चोरट्यांनी तो फोडला आणि येथून ३७ हजारांचा ऐवज चोरीला गेला.
सातारा : सातारा शहरालगत असणाऱ्या गोडोली येथील एक फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने असा ३७ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, प्रफुल्लकुमार भीमराव सरगडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गोडोली येथील विजय साई प्राईडमध्ये त्यांच्या फ्लॅट असून गुरुवारी सकाळी आठ ते दुपारी सव्वातीन वाजण्याच्या दरम्यान, चोरट्यांनी तो फोडला आणि येथून ३७ हजारांचा ऐवज चोरीला गेला. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हवालदार वाघमारे तपास करत आहेत.


