maharashtra

कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा :  डॉ. सुरेश जाधव


File treason case against Kangana Ranaut: Dr. Suresh Jadhav
बेताल वक्तव्य करुन देशाचा व देशासाठी बलिदान दिलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या बद्दल अविचारी, अनैतिक व अवमानकारक अपशब्द वक्तव्य करणाऱ्या कंगणा राणावत हिच्या विरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व खटाव तालुका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहनराव जाधव यांनी पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांना दिले.

पुसेगाव : बेताल वक्तव्य करुन देशाचा व देशासाठी बलिदान दिलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या बद्दल अविचारी, अनैतिक व अवमानकारक अपशब्द वक्तव्य करणाऱ्या कंगणा राणावत हिच्या विरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व खटाव तालुका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहनराव जाधव यांनी पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, ब्रिटीश राजवटीत दीडशे वर्षाच्या कालावधीत ब्रिटीशांनी आपल्या देशवाशिवायंवर अनंत अत्याचार केले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक देशभक्तांनी लढा उभारुन मोठ्या कष्टाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. यासाठी अनेक देशभक्तांना हौतात्म्य पत्करावे लागले. हा भारताचा खरा इतिहास असताना बिनडोक अभिनेत्री कंगना नाणावत हिने प्रसिध्दी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालेले स्वातंत्र्य ही एक भिक आहे, अशी अविचारी, अनैतिक भाषा वापरुन महात्मा गांधी तसेच शहीद देशभक्तांचा मोठा अपमान केला आहे. भारताविषयी वारंवार अपमानास्पद वक्तव्ये करुन समाजात विष पेरणाऱ्या या अभिनेत्रीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा तिला एकप्रकारे प्रशासनाकडून खतपाणी घातले जात आहे, असे दिसून येईल अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असल्याचे डॉ. जाधव यांनी यावेळी नमुद केले. यावेळी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.