filetreasoncaseagainstkanganaranaut:dr.sureshjadhav

esahas.com

कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा :  डॉ. सुरेश जाधव

बेताल वक्तव्य करुन देशाचा व देशासाठी बलिदान दिलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या बद्दल अविचारी, अनैतिक व अवमानकारक अपशब्द वक्तव्य करणाऱ्या कंगणा राणावत हिच्या विरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व खटाव तालुका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहनराव जाधव यांनी पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांना दिले.