maharashtra

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपास विविध गावांचा पाठींबा


Support of various villages for ST staff
एस. टी. महामंडळाचे राज्य शासनाने विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एस. टी. कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपासले आहे. या संपाचा आज अकरावा दिवस आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय सुरुच असली तरी विविध गावांनी व संघटनांनी या संपास लेखी पाठींबा दिला आहे.

सातारा : एस. टी. महामंडळाचे राज्य शासनाने विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एस. टी. कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपासले आहे. या संपाचा आज अकरावा दिवस आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय सुरुच असली तरी विविध गावांनी व संघटनांनी या संपास लेखी पाठींबा दिला आहे.
एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपास परळी, गरजवडी, सोनवडी, लिंब, नागठाणे, मांडवे, अंगापूर, वर्णे, शेळकेवाडी, कौदनी, कारी, तारळे, कडवे, सासपडे, भाटमरळी आदी ग्रामपंचायतीने आपल्या पॅड लेटरसह पाठींबा दिला आहे. तसाच मनसेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार, वंचित बहुजन आघाडी, रिपाई आठवले गट अ चे दादा ओव्हाळ यांनीही या संपास पाठींबा देत राज्यशासनाने एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, असे म्हटले आहे.