पुसेगाव, ता. खटाव येथे विकास जाधव व गौरव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या श्वान शर्यतीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. बैलगाडी शर्यती बंद असल्याने या शर्यती पाहण्यासाठी शौकिनांनी तोबा गर्दी केली होती.
महाबळेश्वर-पोलादपूर रस्ता हा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. असे असतानाही या रस्त्याची डागडुजी व देखभाल-दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अक्षम्य बेजबाबदारपणा केल्याचे दिसून येत आहे. परिणामी संबंधित अभियंत्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी येथील पर्यटक, स्थानिक व्यावसायिक आणि प्रवाशांमधून होत आहे.
पोलिसांनी नो पार्किंग मधील गाडी उचलल्यानंतर वाहन मालक थेट पिस्तूल घेऊन वाहतूक शाखेत शिरल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. एक व्यक्ती पिस्तुलासह वाहतूक शाखेत शिरल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी त्याची पिस्तूल जप्त केली. हि घटना रविवार दि. २१ रोजी सायंकाळी घडली आहे. गणेश हणमंत देवरे (वय २६ वर्षे) रा. गुरसाळे, ता. खटाव, जि. सातारा आणि विकास प्रल्हाद देवरे (वय २६ वर्षे ) रा. दहिवडी, पोस्ट आंबवडे, ता. सातारा अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.
बैलगाडी शर्यतीला प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. शर्यतीच्या आवडीमुळे देशी गाय आणि खिल्लार बैलांचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले जाते. सद्यस्थितीत राज्यात खिल्लार जातीचे बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे संविधान आणि घटनेचा आदर करून तसेच कायद्याच्या चौकटीत राहून बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे.
सोनी मराठी वाहिनीवर येत्या दि. २२ नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या इंडियन आयडल मराठी या कार्यक्रमाची सध्या फार चर्चा आहे. अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा अशी टॅगलाइन हे ब्रीदवाक्य असलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. ही संस्था करते आहे. प्रादेशिक भाषेत इंडियन आयडल पहिल्यांदाच सुरू होणार असून त्याला साजेसे असे परीक्षकही लाभले आहेत.
जिल्हा बँकेसाठी सहकार पॅनेल विरुध्द अपक्ष अशी 10 जागांसाठी 20 जणांमध्ये आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात 11 मतदान केंद्रावर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1964 पैकी 1892 मतदारांनी मतदानांचा हक्क बजावल्याने 96.33 टक्के मतदान झाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढावी यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत असतो. सातारा जिल्ह्यात देखील राष्ट्रवादीच्या मजबूतीसाठी माझे प्रयत्न सुरु असतात. त्यातून कोणाच्या भावना दुखवल्या जात असतील तर माझा नाईलाज आहे.
नाशिक पोलीस आयुक्त व अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून राज्यातील अति महत्वाच्या पदावर कामकाजाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश पवार यांचा अतिशय शिस्तप्रिय व जबाबदार अधिकारी म्हणून महाराष्ट्रामध्ये नावलौकीक होता. त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून सोलापूर, अहमदनगर, रायगड, पुणे ग्रामीण येथे विशेष काम केले आहे.
तालुक्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मेढा येथे वाद झाला. मतदान केंद्रावर वाद झाल्यानं या ठिकाणी काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणाव कायम आहे.
वारूंजी, ता. येथे खासगी व्यवहारातून आर्किटेक्टला मारहाण झाल्याप्रकरणी शनिवारी 20 रोजी सात जणांना अटक करण्यात आली. सायंकाळी त्यांना न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर झाला. याप्रकरणात नितीन छाजेड यांना कोणतीही मारहाण झालेली नाही.