maharashtra

माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रकाश पवार यांचे निधन

Former Additional Director General of Police Prakash Pawar passes away
नाशिक पोलीस आयुक्त व अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून राज्यातील अति महत्वाच्या पदावर कामकाजाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश पवार यांचा अतिशय शिस्तप्रिय व जबाबदार अधिकारी म्हणून महाराष्ट्रामध्ये नावलौकीक होता. त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून सोलापूर, अहमदनगर, रायगड, पुणे ग्रामीण येथे विशेष काम केले आहे.

सातारा : मूळचे सायगाव-पवारवाडी, ता. जावली येथील असणारे माजी आय.पी.एस. अधिकारी, अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रकाश पवार (वय 68) यांचे आज रविवार दि. 21 रोजी अल्पशा आजारामुळे पुणे येथे निधन झाले.  
त्यांच्या पश्चात पत्नी शैलजा, मुलगा संग्राम व तेजस्वीनी, पायलट - कॅप्टन यशास्विनी या दोन मुली असा परीवार आहे. साताऱ्यातील प्रसिद्ध व्यावसायिक राजेंद्र पवार यांचे ते बंधू होत.
नाशिक पोलीस आयुक्त व अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून राज्यातील अति महत्वाच्या पदावर कामकाजाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश पवार यांचा अतिशय शिस्तप्रिय व जबाबदार अधिकारी म्हणून महाराष्ट्रामध्ये नावलौकीक होता. त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून सोलापूर, अहमदनगर, रायगड, पुणे ग्रामीण येथे विशेष काम केले आहे.
सावडण्याचा विधी मंगळवार दि. 23 रोजी पुणे येथील बाणेर स्मशानभूमी येथे होणार आहे.