सर्वपक्षीय सहकार पॅनेलच्या नावाखाली मध्यवर्ती बँक निवडणुक झाली. या निवडणूकीमध्ये सातार्यात वर्चंस्व कोणाचे थोरल्या पवारांचं?, धाकल्याचं?, की रामराजेचं? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सहकार पॅनेलने २१ पैकी १७ जागा जिंकून बँकेत आवाज राष्ट्रवादीचाच हे दाखवून दिले. या निवडणुकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले, तर आमदार शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई या दिग्गजांचा पराभव झाला. समसमान मते पडल्याने काढण्यात आलेल्या ‘ईश्वरचिठ्ठी’ने शिवसेनेचे शेखरभाऊ गोरे यांची जिल्हा बँकेत दमदार एंट्री झाली.
जिल्हा बँक निवडणुकीत आ. शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांनी सातारा शहरातील राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले. यानंतर या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आले आहे.
फायनान्स वर घेतलेल्या टिव्हीची वसूली करण्यासाठी आलेल्या बजाज फायनान्स कंपनीच्या दोन गुंडांनी घरात घुसून टिव्ही तसेच इतर साहित्य पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातील महिलांनी तसेच इतर युवकांनी याला विरोध केला असता त्यांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी गावकरी एकवटल्यानंतर या दोघांनी घटनास्थळावरुन पोबारा केला. दरम्यान, याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या दुकलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगतापवाडी, शाहूनगर येथे अज्ञात चोरट्याने घरातून 60 हजार रुपये किंमतीचे 3 तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरुन नेले. ही घटना दि. 16 ते 20 रोजी या कालावधीत घडली आहे.
एसटी स्टॅन्ड परिसरातील सेव्हन स्टार बिल्डींग समोर असणार्या पार्कींगमधून अज्ञात चोरट्याने एम एच 09 एवाय 3727 ही दुचाकी चोरुन नेली.
सातारा तालुक्यातील पाटखळ येथे घरफोडीची घटना घडली असून या घरफोडीत सुमारे 1 लाख 20 हजारांचा ऐवज चोरीस गेला आहे.
सफरचंद, केळी, पेरू, नाशपाती आणि जांभूळ यांसारखी फळे खाण्याचा कंटाळा येत असेल, जर तुम्हाला ही फळे खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुमच्या आहारात खजूरचा समावेश नक्की करा. यामध्ये असलेले पोषक तत्व तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत करतीलच पण तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी देखील नियंत्रित ठेवतील.
कण्हेर, ता. सातारा येथील धरणातून वर उचलावयाचे सहा टक्के पाणी अडवून उताराच्या बंद पाईपलाईनने संबंधितांना देण्यात यावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शासकीय निमशासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना लागू असलेली राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीने पुन्हा जोर धरला असून त्यासाठी सारे कर्मचारी एकवटले आहेत.