सातारा जिल्ह्यातील लोणंद कोरेगाव पाटण वडूज खंडाळा दहिवडी या सहा नगरपंचायती चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या सहा नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान तर 22 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी ला सुरवात होणार आहे. या नगरपंचायतीना आचारसंहिता लागू झाली आहे.
कराड येथे आर्किटेक्ट जितेंद्र भंडारी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसच्या कराड केंद्राकडून यापूर्वीच निषेध व्यक्त करुन लोकप्रतिनिधीना निवेदनही दिली आहेत. आता या घटनेची गंभीर दखल दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या महाराष्ट्र विभागाने घेतली असून उद्या गुरुवारी 25 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील आर्किटेक्टस दिवसभर काळी फीत बांधून या हल्ल्याचा निषेध करणार आहेत.
सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ज्या नागरिकांनी अद्यापर्यंत पहिला डोस तसेच पहिल्या डोसनंतर दुसरा डोस घेतला नसेल अशा नागरिकांनी लवकरात लवकर कोविड लसीकरणाचा डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
साहित्यप्रेमींच्या गळ्यातील ताईत अन् साहित्याचा मानदंड असलेल्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त नगरपालिका नगरवाचनालयाने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. आजपर्यंत वेगवेगळ्या विषयावर साहित्यातील अनेक संतांनी प्रबोधनाचा जागर मांडला होता. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा राजकारणाचा वसा आणि वारसा देशपातळीवर जपला जात असून त्यांच्या विचारांचे पाईक होण्यासाठी नेत्यांची धडपड सुरू असते.
गेल्या तीन महिन्यापासून सर्वसाधारण सभा न झाल्याने सर्वसामान्यांची विकास कामे खोळंबून पडली आहेत. लोकांचे प्रश्न सोडवायचे नाही तर खुर्चीत बसायचे कशाला ? असा सणसणीत सवाल नगर विकास आघाडीने निवेदनाद्वारे विचारला आहे. लवकरात लवकर सर्वसाधारण सभा न निघाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला असून नगरविकास आघाडीने हे निवेदन बुधवारी जिल्हा प्रशासनाला सादर केले.
रुग्णालयातून रुग्ण घरी आल्यानंतरही काही रुग्णांना दीर्घकाळ ठराविक साधनांची गरज भासते. ही साधने त्या काळात अत्यावश्यक असली, तरी काही काळानंतर त्या साधनांची रुग्णांना गरज भासत नाही. गरीब व गरजू कुटुंबातील रुग्ण अशी साधने कायमची विकत घेऊ शकत नाहीत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कराड सोसायटी मतदारसंघातून सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांचा विजय झाला. त्यांनी ८ मतांनी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा पराभव केला. हा निकाल जाहीर झाला. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. तसेच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे जल्लोषी स्वागत केले.
दहावी पास उमेदवाराची पोलीस पाटील पदी केलेली नियुक्ती महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाने रद्दबातल ठरविली.
सर्वपक्षीय सहकार पॅनेलच्या नावाखाली मध्यवर्ती बँक निवडणुक झाली. या निवडणूकीमध्ये सातार्यात वर्चंस्व कोणाचे थोरल्या पवारांचं?, धाकल्याचं?, की रामराजेचं? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सहकार पॅनेलने २१ पैकी १७ जागा जिंकून बँकेत आवाज राष्ट्रवादीचाच हे दाखवून दिले. या निवडणुकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले, तर आमदार शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई या दिग्गजांचा पराभव झाला. समसमान मते पडल्याने काढण्यात आलेल्या ‘ईश्वरचिठ्ठी’ने शिवसेनेचे शेखरभाऊ गोरे यांची जिल्हा बँकेत दमदार एंट्री झाली.