यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत आज डाॅ. प्रा. आनंद पाटील यांचे व्याख्यान
48 वी व्याख्यानमाला : नगरवाचनालयाच्या वतीने आयोजन, रसिक, विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
साहित्यप्रेमींच्या गळ्यातील ताईत अन् साहित्याचा मानदंड असलेल्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त नगरपालिका नगरवाचनालयाने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. आजपर्यंत वेगवेगळ्या विषयावर साहित्यातील अनेक संतांनी प्रबोधनाचा जागर मांडला होता. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा राजकारणाचा वसा आणि वारसा देशपातळीवर जपला जात असून त्यांच्या विचारांचे पाईक होण्यासाठी नेत्यांची धडपड सुरू असते.
कराड : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड नगरपालिका नगरवाचनालयाच्या वतीने 48 व्या यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत आज गुरुवारी 25 रोजी डाॅ.प्रा.आनंद पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले असल्याची माहिती नगरवाचनालयाचे ग्रंथपाल संजय शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
साहित्यप्रेमींच्या गळ्यातील ताईत अन् साहित्याचा मानदंड असलेल्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त नगरपालिका नगरवाचनालयाने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. आजपर्यंत वेगवेगळ्या विषयावर साहित्यातील अनेक संतांनी प्रबोधनाचा जागर मांडला होता. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा राजकारणाचा वसा आणि वारसा देशपातळीवर जपला जात असून त्यांच्या विचारांचे पाईक होण्यासाठी नेत्यांची धडपड सुरू असते. त्याचप्रमाणे त्यांच्या साहित्य निर्मितीतून निघणारा सुगंध देशभर दरवळत राहावा, या उद्देशाने नगरपालिका नगरवाचनालयाच्या वतीने दरवर्षी यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते.
यशवंतराव चव्हाण स्मृती दिनाच्या कार्यक्रमात यावेळी आंतरराष्ट्रीय तुलनाकार साहित्यिक आणि समीक्षक नामवंत वक्ते प्रा. डॉ. आनंद पाटील, निवृत्त इंग्रजी विभाग प्रमुख गोवा विद्यापीठ यांचे "ग्रंथांनी रचलेला महापुरुष- यशवंतराव चव्हाण" या विषयावर व्याख्यानरुपाने विचार ऐकण्याची संधी साहित्य व यशवंत प्रेमींना मिळणार आहे.
नगरपालिका नगर वाचनालयाच्या वतीने सन 1973 पासून सुरू करण्यात आलेली यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला साहित्यप्रेमींच्या उदंड प्रतिसादामुळे गेली 47 वर्षे अखंडपणे सुरू आहे. या व्याख्यानमालेत नामवंत व्याख्यात्यांनी आजपर्यंत व्याख्याने दिली आहेत. डॉ.प्रा. आनंद पाटील यांचे व्याख्यान गुरुवारी 25 रोजी सायंकाळी 6:30 वाजता यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन टाऊन हॉल येथे आयोजित केलेले आहे.
या व्याख्यानास कराडच्या रसिक श्रोते, विद्यार्थी वर्गाने बहुसंख्येने उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा, अशी विनंती नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी रमाकांता डाके व सर्व नगरसेवकांनी केली आहे.