maharashtra

सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी नगरपंचायत क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू; २१ डिसेंबरला मतदान, तर २३ डिसेंबरला मतमोजणी

Election program of six Nagar Panchayats in Satara district announced
सातारा जिल्ह्यातील लोणंद कोरेगाव पाटण वडूज खंडाळा दहिवडी या सहा नगरपंचायती चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या सहा नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान तर 22 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी ला सुरवात होणार आहे. या नगरपंचायतीना आचारसंहिता लागू झाली आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातील लोणंद कोरेगाव पाटण वडूज खंडाळा दहिवडी या सहा नगरपंचायती चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या सहा नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान तर 22 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी ला सुरवात होणार आहे. या नगरपंचायतीना आचारसंहिता लागू झाली आहे.
याबाबतचे राज्य निवडणूक आयोगाचे अध्यादेश जिल्हाधिकारी कार्यालयाला बुधवारी सायंकाळी प्राप्त झाले. सहकार क्षेत्रातील निवडणुकांचा धुरळा खाली बसल्यावर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 105 नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम पहिल्या टप्प्यात हाती घेतला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील लोणंद कोरेगाव पाटण वडूज खंडाळा दहिवडी या नगरपंचायतींचा समावेश असून या नगरपंचायती चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने बुधवारी सायंकाळ पासूनच आचार संहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हे आदेश निर्गमित केले असून जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे आचारसंहिता लागू झाल्याचे आदेश त्या नगरपंचायतीना देण्यात आले.
निवडणूक कार्यक्रम परिशिष्ट एक प्रमाणे निर्देशित 29 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकार्यांनी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करून 30 नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करावयाचा आहे. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र 1 ते 7 डिसेंबर या दरम्यान (4 व5 डिसेंबर सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 11 ते 3 या वेळेत दाखल करावयाचे आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी व अंतिम यादी 8 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अर्ज माघारी 13 डिसेंबर रोजी व अर्ज माघारी इतर तांत्रिक कारणाचे अपिल असल्यास त्याची सुनावणी 16 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत होणार आहे. दि 14  डिसेंबर रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 21 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान, तर दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
१ . नामनिर्देशन दाखल - 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर - दुपारी ३ वाजेपर्यंत
2 अर्ज छाननी -8 डिसेंबर
३ अर्ज माघारी - 13 डिसेंबर - 3 वाजेपर्यंत
४ . चिन्ह वाटप - 14 डिसेंबर
५ . अपिल सुनावणी - 16 डिसेंबर
६ . मतदान - 21 डिसेंबर (सकाळी 7.30 ते सायंकाळी 5:30)
७ . मतमोजणी - 22 डिसेंबर (सकाळी दहा वाजल्यापासून )