चोरीचा गुन्हा दोन तासात उघड करुन लाखाचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
सातारा शहर तसेच जिल्ह्यामध्ये चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना घरफोडीचे गुन्हे उघड करण्याचे आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांच्या अधिपत्याखाली विशेष पथकाची नियुक्ती केली होती.
सातारा : कंपनीच्या उघड्या शेडमधील सुमारे 65 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेणार्या चोराच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळण्यात यश मिळवले आहे. गुन्ह्याची ही उकल गुन्हा घडल्यापासून केवळ दोन तासात करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी, सातारा शहर तसेच जिल्ह्यामध्ये चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना घरफोडीचे गुन्हे उघड करण्याचे आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांच्या अधिपत्याखाली विशेष पथकाची नियुक्ती केली होती.
दि. 22 रोजी नवीन एम.आय.डी.सी. सातारा येथील पंडीत ऍटोमोटीव्ह सातारा प्रा.लि. या कंपनीच्या उघडया शेडमधील 25 हजार रुपये किंमतीचा एक पिवळया रंगाचा मोठ्या गाडयांचा जॅक आणि 40 हजार रुपये किंमतीचा एक मोकळा ऑक्सीजन गॅस सिलेंडर असा सुमारे 65 हजार रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्याबाबत गणेश श्रीरंग राऊत, रा. मु.पो. परळी ता.जि.सातारा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यातील आरोपीची माहिती किशोर धुमाळ यांना मिळाल्याने त्यांनी पोउनि गणेश वाघ व त्यांच्या पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्याप्रमाणे गणेश वाघ व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार यांनी अजंठा चौक सातारा येथे सापळा येथे दोनजणांना सापळा रचून पकडून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल व एक हिरो स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण 1 लाख 10 हजार रुपयांचा माल हस्तगत करुन आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईकामी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांच्या सुचनांप्रमाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, पो.हवा. अतिष घाडगे, संजय शिकं, विजय कांबळे, संतोष संकपाळ, शरद बेबले, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे, स्वप्निल माने, विक्रम पिसाळ, मोहन पवार, पो.कॉ. रोहित निकम, स्वप्निल दौंड, वैभव सावंत, पृथ्वीराज जाधव, चालक गणेश कचरे यांनी केली आहे.


