Satara

esahas.com

अपघातात जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा

मद्यप्राशन करून अपघातात जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

वेचले येथे वनविभागाच्या कारवाईत 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

वेचले, ता. सातारा गावच्या हद्दीत वन विभागाने कारवाई करत विनापास, विनापरवाना सागवान, रायवळ लाकडांची वाहतुक करून ठेवण्यात आलेला ट्रॅक्टर- ट्रॉली ताब्यात घेतली.  या कारवाईत लाकडांसह ट्रॅक्टर-ट्रॉली असा 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सरत्या वर्षातील वनविभागाची आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

esahas.com

हरिहरेश्वर बॅक घोटाळ्याची चौकशी ईडीने करावी

हरिहरेश्वर बँकेच्या दीड हजार खातेदारांची तब्बल चाळीस कोटीची फसवणूक विद्यमान संचालकांनी केली आहे. 29 पैकी केवळ 5 संचालकांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे, मात्र आरोपी समोर असूनही पोलीस मात्र अटकेची कारवाई करत नाही. या संपूर्ण घोटाळ्याचा प्रवर्तन संचालनालय अथवा केंद्रीय गुन्हे अन्वेषण मार्फत करण्यात यावा, अशी मागणी हरिहरेश्वर बॅक खातेदार कृती समिती च्या वतीने पत्रकार परिषदेत केली.

esahas.com

नगरपालिकांमध्ये मुख्याधिकाऱ्यांचे प्रशासकीय राज सुरू

सातारा जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये सोमवारपासूनं मुख्याधिकाऱ्यांचे प्रशासक राज सुरू झाले. मुख्याधिकाऱ्यांच्या देखरेखी अंर्तगत कार्यकारी समितीद्वारे आचारसंहिता लागू होईपर्यंत कारभार चालविला जाणार आहे.

esahas.com

नगरपालिकेकडून छत्रपती संभाजी मार्केटची स्वच्छता

शहरातील छत्रपती संभाजी महाराज मार्केटमध्ये गेल्या काही महिन्यापासून पारध्यांनी तळ ठोकला होता. तसेच त्यापरिसरात यांनी प्रचंड कचरा आणि घाण केली होती. त्यामुळे नागरिक, शेतकरी, व्यापाऱ्यांना त्रास होत असल्याने त्यांनी याबाबत नगरपालिकेकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत पालिकेने छत्रपती संभाजी मार्केट परिसराची स्वच्छता केली. तसेच त्याठिकाणी तळ ठोकून बसलेल्या पारध्यांनाही पोलिसांच्या मदतीने हूसकावून लावले आहे.

esahas.com

महागड्या गाड्या, प्रायव्हेट जेट ते समुद्राच्या बाजूला आलिशान बंगला, ‘अशीये’ रतन टाटांची लाईफस्टाईल

रतन टाटा आपल्या लाईफस्टाईलमुळेही चर्चेत असतात. त्यांच्याकडे खुप महागड्या गाड्या आणि प्राईवेट जेट आहे. रतन टाटा यांच्याकडे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मुंबईमध्ये एक आलिशान बंगला आहे. तो मुंबई शहरातला सगळ्यात महागड्या बंगल्यांपैकी एक आहे.

esahas.com

दारुड्याने उडवली सात वाहने

सोमवारी रात्री सातार्‍यातील राजपथावर नगरपालिका ते कमानी हौदापर्यंत अपघाताचा थरार उडाला. मद्यधुंद चारचाकी चालकाने चार चारचाकी व तीन दुचाकींना बेदरकारपणे धडक दिली. या अपघात सत्राने राजपथ हादरला असून प्राथमिक माहितीनुसार सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मद्यधुंद चालकाला नागरिकांनी चोप देवून पोलिसांच्या ताब्यात दिले.

esahas.com

चिंचणेर वंदनचा पोलीस पाटील लाचलुचपतच्या जाळ्यात

अदखलपात्र गुन्ह्यामध्ये प्रतिबंधक कारवाईत मदत करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेताना चिंचणेर वंदन, ता. सातारा येथील पोलीस पाटील चंद्रकांत तुकाराम बर्गे याला सोमवारी सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईने सातारा महसूल विभागामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

esahas.com

विसावा नाका परिसरातुन युवती बेपत्ता

येथील विसावा नाका परिसरातून एक युवती बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

सातारा नजीक दुचाकी अपघात; एकाचा मृत्यू

खेड, ता. सातारा गावच्या हद्दीत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल महिंद्रा समोर दुचाकीचा अपघात होऊन पाठीमागे बसलेल्या एकाचा मृत्यू झाला तर दुचाकी चालक या अपघातात जखमी झाल्याची घटना घडली.