महागड्या गाड्या, प्रायव्हेट जेट ते समुद्राच्या बाजूला आलिशान बंगला, ‘अशीये’ रतन टाटांची लाईफस्टाईल
भारतातील उद्योगपती रतन टाटा जसे पैशांनी श्रीमंत आहेत तसेच ते मनानेदेखील श्रीमंत आहेत.
रतन टाटा आपल्या लाईफस्टाईलमुळेही चर्चेत असतात. त्यांच्याकडे खुप महागड्या गाड्या आणि प्राईवेट जेट आहे. रतन टाटा यांच्याकडे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मुंबईमध्ये एक आलिशान बंगला आहे. तो मुंबई शहरातला सगळ्यात महागड्या बंगल्यांपैकी एक आहे.
आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल ते ज्या विनम्र पद्धतीने वागतात त्यामुळे ते पुर्ण जगात आपल्या शांत आणि संयमी स्वभावासाठी खुप प्रसिद्ध आहेत. काही दिवसांपुर्वी ते आपल्या एका आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. त्यानंतर लोकांनी त्यांची खुप प्रशंसा केली होती. कोरोनाकाळात ऐकीकडे सगळ्यांचे हाल होत होते तर रतन टाटांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा एक रूपयाही कापला नाही. या व्यतिरीक्त रतन टाटा आपल्या लाईफस्टाईलमुळेही चर्चेत असतात. त्यांच्याकडे खुप महागड्या गाड्या आणि प्राईवेट जेट आहे. रतन टाटा यांच्याकडे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मुंबईमध्ये एक आलिशान बंगला आहे. तो मुंबई शहरातला सगळ्यात महागड्या बंगल्यांपैकी एक आहे. आज आम्ही अशाच पाच त्यांच्या आलिशान वस्तुंबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. रतन टाटा यांच्याकडे शानदार फेरारी कॅलिफोर्निया ही कार आहे. ही कार भारतात भेटत नाही. रतन टाटांना बऱ्याचवेळा या गाडीसोबत पाहण्यात आले आहे. भारतात या गाडीची किंमत ४.४४ कोटी इतकी आहे. रतन टाटांकडे प्राईवेट जेट आहे त्याचे नाव आहे dassault falcon.रतन टाटांकडे dassault falcon 2000 फ्रांसमधील प्राईवेट जेट आहे. या प्राइवेट जेटमध्ये दोन इंजिन आहेत. या जेटला खासकरून फ्रांसच्या एक्सपर्ट इंजिनीअर्सची मदत घेऊन बनवण्यात आले आहे.


