maharashtra

अपघातात जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा


Crime on car driver for injured in accident
मद्यप्राशन करून अपघातात जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : मद्यप्राशन करून अपघातात जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २७ रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोवई नाका- राजवाडा मार्गावर डॉ. मोहन पाटील यांच्या दवाखान्यासमोर रेनॉल्ट कार क्रमांक एम.एच,११ बीव्ही ७०१५ वरील चालक गौरव मधुकर कदम, वय ४०, रा. कमानी हौद, मल्हार पेठ, सातारा याने मद्यप्राशन करून कारने गौरव बाळकृष्ण शिवदास, रा. सदाशिव पेठ, सातारा यांच्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक देऊन त्यांच्या वाहनाचे नुकसान करून अपघात केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.