maharashtra

रेठऱ्यात वीज कर्मचाऱ्याला तिघांकडून मारहाण

गुन्हा दाखल : थकीत वीज बील वसुलीसाठी गेल्यावर मारहाण

Three beaten up by electrician
रेठरे बुद्रुक ता. कराड येथे वसुलीसाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्याला तिघांनी मारहाण केली. सोमवारी 27 रोजी ही घटना घडली. याप्रकरणी तिघांवर कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कराड : रेठरे बुद्रुक ता. कराड येथे वसुलीसाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्याला तिघांनी मारहाण केली. सोमवारी 27 रोजी ही घटना घडली. याप्रकरणी तिघांवर कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हणमंत विश्वनाथ धर्मे, विनायक हणमंत धर्मे, प्रथमेश धर्मे तिघेही रा. रेठरे बुद्रुक ता. कराड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर गौरव दिगंबर शेळके यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  महावितरणच्या कराड ग्रामीण विभागातील रेठरे बुद्रुक शाखेचे शाखाधिकारी वैभव राजमाने यांनी थकीत वसुली संदर्भात सूचना देत कर्मचाऱ्यांना वसुलीला पाठवले होते. त्यानुसार गौरव शेळके, सुरेश जाधव, राजेंद्र नायकवडी, बाबासाहेब बाबर, गणेश पवार हे कर्मचारी सोमवारी 27 रोजी दुपारच्या सुमारास रेठरे बुद्रुक येथील हनुमंत धर्मे यांच्याकडील थकित वीज बिल वसुलीसाठी गेले होते.  
यावेळी हनुमंत धर्मे यांनी वीज बिल देणार नाही, असे म्हणत त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांचा मुलगा विनय व प्रथमेश यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.