Satara

esahas.com

इन्स्टाग्रामवरून अल्पवयीन युवतीचा व तिच्या आईचा विनयभंग

इन्स्टाग्रामवर युवतीचे बनावट अकाउंट काढून जवाहर नवोदय विद्यालयातल्या युवकाने अल्पवयीन युवतीचा व तिच्या आईचा पाठलाग करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी त्या युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या युवकास अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

esahas.com

फलटण तालुक्यात चार दारू अड्डयांवर छापे

फलटण तालुक्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणाऱ्या दारू अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ६ हजार ४२० रुपये किमतीच्या हातभट्टी व देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.

esahas.com

राष्ट्रवादी काँग्रेसचे रविवारी सभासद नोंदणी अभियान

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवार दि. २० फेब्रुवारी रोजी येथील राष्ट्रवादी भवनमध्ये सभासद नोंदणी अभियान व नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली.

esahas.com

वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे निघाले टेंडर; चारशे कोटीत बांधकाम

पहिल्या टप्प्यात सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाची मुख्य इमारत व त्यानंतर इतर इमारतींची बांधकामे होतील. त्यासाठी टेंडरची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. वैद्यकिय शिक्षण विभागाच्या मान्यतेने बांधकाम विभागाने ही टेंडर प्रक्रिया सुरु केली आहे.

esahas.com

ग्लोबल वॉर्मिंगवरील परिसंवादाचे पर्यावरणमंत्री ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन

सध्या ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणाम आपण पहातोच आहे. शेतकऱ्यांना शेतीमध्ये उत्पन घेताना पिकांवर वेगवेगळे रोग पडतात. त्यामध्ये ऊस, आल, हळद यासह सर्वच पिकांचे उत्पन्न घटते आहे. त्याकरीता जिल्हा बँक आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल वॉर्मिंग या परिसंवादाचे आयोजन आयोजन रविवार दि. २० रोजी जिल्हा बँकेच्या सभागृहात करण्यात आले आहे.

esahas.com

जिल्हा परिषद चौकातील सिग्नल यंत्रणा सुरू

गेल्या अनेक महिन्यांपासून सातारा येथील जिल्हा परिषद चौकातील बंद असलेली सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची पालिकेला उपरती झाली.

esahas.com

नागेवाडी फाट्याजवळील अपघातप्रकरणी पुणे येथील एकावर गुन्हा

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागेवाडी फाटा येथे पिकअप वाहनाला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरून अन्य एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी फोर्ड वाहनचालक सुरज सुभाष देसाई, रा. कर्मवीर सोसायटी, सेनापती बापट रोड, पुणे यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

कराडात डॉक्टर महिलेवर कोयत्याने वार

येथील बुधवार पेठेतील शिवाजी क्लॉथ मार्केट समोर एकाने डॉक्टर महिलेवर कोयत्याने वार केला. तुम्ही वीज कनेक्शन जोडू नका; नाहीतर तुम्हाला जिवंत ठेवत नाही, असे म्हणून संबंधिताने हे कृत्य केले. गुरूवारी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

संगमनगर येथून ७५ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी

संगमनगर, (खेड) ता. सातारा येथील एका अपार्टमेंटमध्ये असणाऱ्या फ्लॅटमधून एका दाम्पत्याने ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

दत्तनगर येथे मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे

येथील औद्योगिक वसाहत परिसरात असणाऱ्या दत्तनगर येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.