पहिल्या टप्प्यात सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाची मुख्य इमारत व त्यानंतर इतर इमारतींची बांधकामे होतील. त्यासाठी टेंडरची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. वैद्यकिय शिक्षण विभागाच्या मान्यतेने बांधकाम विभागाने ही टेंडर प्रक्रिया सुरु केली आहे.
सातारा : पहिल्या टप्प्यात सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाची मुख्य इमारत व त्यानंतर इतर इमारतींची बांधकामे होतील. त्यासाठी टेंडरची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. वैद्यकिय शिक्षण विभागाच्या मान्यतेने बांधकाम विभागाने ही टेंडर प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात वैद्यकीय महाविद्यालयाची मुख्य इमारत, विद्यार्थी होस्टेलस॒, कर्मचारी व डॉक्टर्सचे निवासस्थान, किचन आणि डायनिंग हॉलचा यामध्ये समावेश आहे. अत्यंत सुसज्ज अशा या इमारती होणार असून त्यासाठी चारशे कोटींचे टेंडर आज प्रसिद्ध झाले आहे.
सातारा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाच्या टेंडरमध्ये दिग्गज कंपन्या सहभागी होण्याची शक्यता आहे. या कंपन्यांशी संबंधित राजकीय नेते मंडळीही टेंडर आपल्या संबंधित कंपनीला मिळावे प्रयत्न करण्याची शक्यता आहे. यासाठी या नेते मंडळीत चढाओढ लागणार आहे. सध्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत असून, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांनीही यावर विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे; पण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचे या सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. मात्र, इतक्या मोठ्या रकमेचे टेंडर मिळविण्यासाठी कंपन्यांकडून नेते मंडळींना साकडे घालण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. त्यामुळे या टेंडर प्रक्रियेत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.