येथील बुधवार पेठेतील शिवाजी क्लॉथ मार्केट समोर एकाने डॉक्टर महिलेवर कोयत्याने वार केला. तुम्ही वीज कनेक्शन जोडू नका; नाहीतर तुम्हाला जिवंत ठेवत नाही, असे म्हणून संबंधिताने हे कृत्य केले. गुरूवारी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कराड : येथील बुधवार पेठेतील शिवाजी क्लॉथ मार्केट समोर एकाने डॉक्टर महिलेवर कोयत्याने वार केला. तुम्ही वीज कनेक्शन जोडू नका; नाहीतर तुम्हाला जिवंत ठेवत नाही, असे म्हणून संबंधिताने हे कृत्य केले. गुरूवारी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शिवाजी रघुनाथ सूर्यवंशी रा. यशवंत बिल्डींग, बुधवार पेठ, कराड असे गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे. तर स्नेहल अनिल त्रिबंके (वय 55) रा. अर्थव रूक्मिणी ईस्टेटि, शिवाजी हौसिंग सोसायटी पाठीमागे बुधवार पेठ, कराड यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधितावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.


